HTML tutorial  मराठी   HTML tutorial HTML tutorial  HTML tutorial   HTML tutorial  HTML tutorial

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

भाग्यलक्ष्मी- हेवीवेट चॅम्पियनशीप



मॅचः भाग्यलक्ष्मी- हेवीवेट चॅम्पियनशीप
स्पर्धक: बाप्पा Vs. सरिता
व्हेन्यु: झी मराठी
दि. ३ सप्टे. २०१०
वेळ संध्या ७:३०








     टिव्हीच्या या कॉर्नरमधे आहेत उघडे-पोट, डोक्याला शेंडी आणि ३५० पौडं वजनाचे बाप्पा (टाळ्या आणि घोषणा 'बाप्पांचा विजय असो.' बाप्पा प्रतिस्पर्ध्याकडे गोलीअथ सारखा बघतो, विमान लॅन्डींगचा आवाज)टिव्हीच्या दुसय्रा कॉर्नर मधे आहेत बाप्पाच्या प्रतीस्पर्धी  सासु-घोषित नव-भाग्यल्क्ष्मी सरिता (सरिताचा नवरा तिच्या हाताला घट्ट् पकडून हाताची मालीश करतोय, सरिताची भलीमोठी सासु बाप्पाला खुन्नस देते, बाप्पा पुन्हा हसतो. कोणीच टाळ्या वाजवत नाही, पुन्हा दोन विमान लॅन्ड होतात)

     स्पर्धेचे नियम या प्रमाणे आहेत. तराजुच्या एका टोपल्यात बाप्पा फतकल मारतील आणि दुसय्रा पारड्यात सरिता बसेल. ज्याचे पारडे जड असेल त्याला विजेता घोषित करण्यात येईल. स्पर्धकाने तागडीमधे एकटच बसायच आहे, कोणीही जड सासुला अथवा नवय्राला घेऊन बसु नये. ईथे आपण स्पर्धा करायला आलो आहोत, तराजू तोडायला नाही. प्रत्येक स्पर्धकाला दैवशक्ती वापरण्यास परवानगी आहे. (आणखी दोन विमानं लॅन्ड होतात, दुर कोणीतरी डमरू वाजवायला लागतो) जिंकणाय्रा स्पर्धकाला अनडिस्प्युटेड हेवीवेट-चाम्पियन म्हणुन घोषित करण्यात येईल आणि  भाग्यलक्ष्मी या कार्यक्रमात पुढच्या अनेक वर्षांसाठी दररोज दिवसातुन दोन वेळा पब्लिकला टॉर्चर करण्याचा पास देण्यात येईल. (सरिताची सासु पुन्हा बाप्पाला खुन्नस देते, बाप्पा डोळे वटारून प्रतीस्पर्धी टिमकडे बघतो, सरिताचा नवरा अजुन हातमालिश करतोय) हारणाय्रा प्रतिस्पर्ध्याचे करिअर या मॅचनंतर संपुष्टात येईल. त्याला पुन्हा कोणत्याही मॅचमधे भाग घेता येणार नाही. प्रोत्साहनपर बक्षिस म्हणुन हारणाय्रा स्पर्धकाला कायम स्वरूपी वास्तव्य करण्यासाठी गावातील नदीचा तळ देण्यात येईल (बाप्पा डोळे वटारतो, आणि सरिताची सासु त्याच्यापेक्षा दिडपट डोळे वटारते. सरिताच्या नवय्राला डोळे वटारण्याची गरज नाही, त्याच्या डोळ्यात मेकअप मॅन ने मुक्तहस्ताने काजळ उधळलय, अजुन तीन विमानं). मॅच सुरू होण्याची बेल आणि त्यासोबत स्पर्धकानां प्रोत्साहन देण्यासाठी ढोलकं, ताशा वाजायला लागतात.

     वयाने आणि शरिराने जास्त असल्याने पहिला मान बाप्पांचा म्हणुन बाप्पा आखाड्यात पहिले उतरतात. गजगामिनीला देखिल लाजवतील अशी चाल करत एका टोपल्यात जाऊन बसतात (कर्रर आवाज... बाप्पांचा विजय असो!- घोषणा). बाप्पांची सलामी एन्ट्री पाहून सरिताला मॅच खेळायची का नाही असा प्रश्न पडतो. ती कच खाऊन माघार घेणारच असते पण तीची सासू आणि तीचा नवरा वेळेवर तीला प्रोत्साहन देतात. तीला सपोर्ट करण्यासाठी सरिताचे ईतर फॅमिली मेंबर्स म्हणजे तीची थोरली जाऊ काशी आणि दिर देखिल स्टेडिअम मधे दाखल होतात. सरिताचा दिर मॅचबद्दल खुपच एक्सायटेड आहे. तो दोन्ही हात आणि डोके(?) एकाचवेळी हालवून सरिताला चिअर-अप करतो. नवरोबा आणि सासुच्या सुचनेनुसार सरिता आखाड्यात प्रवेश करते आणि पारड्यात जाऊन बसते.

     पुढे काय होणार सगळ्यांना उस्तुकता वाटते, विमान आणि बॉम्बचा वर्षाव होत असतो. ढोलकी-ताशे वाजत्री सुध्धा रंगात आलेले असतात. सरिता रिकाम्या पारड्यात जाऊन बसल्यावर बाप्पाच्या वजनाने खाली गेलेली तराजू तसूभर देखिल हालत नाही. ईतक्यात कोणीतरी 'आली आली भाग्यलक्ष्मी' चे गाणे सुरू करतो. कॅमेरा काशीच्या दिशेला जातो, जाडाढोल बाप्पाचे टोपले कापुस भरल्या सारखे वर जायला लागते. मॅचने अचानक फिरल्यामुळे बाप्पाच्या डोक्यावर घाम यायला लागतो. निर्णायक स्थानी मॅच आल्याने पब्लिकची उत्कठां शिगेला पोहोचते. अखेर सरिताचं पारडं जमिनीला टेकते. सकाळी दाबून मसाले भात खाल्ल्याने फायदा झाला पाहून सरिता सुटकेचा स्वास सोडते.  सरिताला हेवीवेट दैवी चॅम्पियन म्हणुन घोषित करण्यात येतं.

     सरिताची सासू, नवरा आनदोंत्सव साजरा करतात. काशीच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहायला लागतात. मैच संपली तरी काशीचा नवरा हात आणि मान हालवत आनंद साजरा करतो. सरिताची आखाड्यापासुन ते घरापर्यंत लाल-गुलाल, हळद उडवत मिरवणुक येते.

     तेवढ्यात छोट्या काशीचा प्रवेश होतो, आणि ती स्व;ताशीच पुटपूटते, 'मला माहिती होते की ती जिंकणारच होती, तीच्यासोबत तराजूत सात बुटके जे बसले होते'

*सुचना: या कार्यक्रमाचे प्रक्षेपण शुक्रवार दि. ३ सप्टे. २०१० रोजी संध्या ७:३० वाजता करण्यात येईल, प्रेक्षकानीं स्व:ताच्या रिस्कवर कार्यक्रम बघावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...