HTML tutorial  मराठी   HTML tutorial HTML tutorial  HTML tutorial   HTML tutorial  HTML tutorial

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

तहान

     "अरे यार! स्पिड वाढव !", अम्रेश ओरडला ," common~~ अजून स्पिड !"

     "८५ ला आहे", विराज समोर डोळे फाडून गाडी चालवत होता. एका हातात स्टिअरींग आणि एका हाताखाली गिअर रॉड सतत चेजं केल्याने त्याला कमालीचा घाम सुटला होता.

अम्रेशने रिअर ग्लासमधुन मागे बघीतले. "मागे पोलिस अजुनपण आहेत", अम्रेश म्हणाला, "चल यार! अजुन फास्ट". जंगलमधून जाणाय्रा त्या रस्त्यावर ४०० मिटरांच्या अतंरावर सायरन वाजवत रेड लाईट असलेली पोलिस कार त्यांचा पाठलाग करत होती. दुरून येणारा त्याचा आवाज हळुहळू कमी होत होता.

     "मागे एकदा.... मी बघीतलेला... हा.. ईथेच साईडला, एक चोर रस्ता आहे",  ईतके म्हणून विराज ने स्टीअरींग फिरवून सफाईदारपणे कार आडमार्गाला बाजूच्या झाडीमागे घेतली. कारचे सगळे लाईटस ऑफ केले.

मागून येणाय्रा पोलिसानां काहिच समजले नाही की कार अचानक कुठे गायब झाली. ते सायरन वाजवत सरळ रस्त्याने पुढे निघून गेले.

थोड्यावेळातच मुख्य रस्ता मागे सोडून विराज आणि अम्रेश त्या आडमार्गावर खुप दुर आले होते.

     "ते बघ तिकडे", विराज म्हणाला, "त्या लाईटस."

     "मला वाटत एखादं हॉटेल किंवा कुणाचतरी फार्म हाऊस आहे." अम्रेश खुश होऊन म्हणाला, "अशा या रस्त्याला पोलिसच काय पण त्यांचा बाप सुध्दा येणार नाही."

गेट समोर कार आल्यावर विराज ने जोरात ब्रेक दाबला. घराचा दरवाजा उघडाच होता. आत फक्त एक दिवा जळत असेल ईतकाच अधुंक प्रकाश होता. अम्रेशने बॅक सिटवर असलेली एक काळ्या रंगाची बॅग उचलली आणि ती घेऊन दोघानीं त्या घरामधे प्रवेश केला.

ते घर जुनं पुराण ईग्रंजाच्या काळातलं वाटत होत. जुन्या प्रकारचे लाकडी सोफा आणि खुर्च्या असलेले. भिंतीवर काही जुनाट तस्विरी. हॉलच्या एका बाजूने उतरणारा जिना. एखाद्या जुन्या काळच्या बंगल्याप्रमाणे.

अम्रेशने दरवाजावर ठोठवून करून विचारले, "HELLO~, कोई है क्या ईधर?" आवाज ऐकून एक वयस्कर माणूस जिन्यावरून खाली आला. "अरे काका, आम्ही जंगलात रस्ता चुकलोत. आज रात्रीसाठी ईथे थांबायला एखादी रूम मिलेगा क्या?" अम्रेशने विचारले.

तो वृध्द माणूस शांतपणे त्यांच्याकडे बघत बसला.

     "अरे अंकल, आज के लिये यहां रुकनेके लिये कुछ रूम वैगेरे मिलेगा क्या?" विराज ने पुन्हा विचारले.

तो वृध्द माणूस परत जाण्यासाठी मागे वळला.

     "ए म्हाताय्रा..." अम्रेश ने आवाज वाढवला, "मी काय विचारतोय, निट लक्ष दे, आम्हाला, रूम मिळेल का?" त्याचा हात जॅकेट मधे असलेल्या पिस्तूला कडे गेला होता. "फक्त आजची रात्र, सकाळी आम्ही निघुन जाऊ", अम्रेशने पिस्तूल त्या वृध्द माणसाकडे रोखत आदेश दिला.

अम्रेशकडे फक्त एक नजर टाकून तो वृध्द थरथरत जिन्याकडे गेला. जाता जाता कापय्रा आवाजात म्हणाला, "रूम न. पाच, वरच्या मजल्यावर आहे."

विराज आणि अम्रेश त्याच्या मागे मागे जिना चढू लागले. ती रूम हॉल पेक्षा वाईट अवस्थेत होती. खोलीमधे मधे कुबट वास पसरला होता. एक लोखंडी डबल बेड, बाजूला एक लाकडी स्टूल, भिंतीवर काच फुटलेला जुनाट आरसा आणि निघालेले वॉलपेपर आणि भकास वाटणाय्रा छताला लटकलेले झुंबर उगाचच आवाज करत होत.

     "ओह! काय बकवास जागा आहे", विराज ने कपाळाला आठ्या आणत म्हटले, "झुरळ आणि उदरांशिवाय ईथे काही सुध्दा मिळणार नाही."

     "अरे काका ईधर कुछ खाने-पिने के लिये कुछ मिलेगा क्या? खुप तहान लागलेय", अम्रेशने त्या म्हाताय्रा माणसाला विचारले. थोड्यावेळाने टक-टक दरवाजावर करून तो म्हातारा त्यांच्या रूम मधे आला. सोबत त्याने जुन्या दारूची एक बाटली आणि दोन ग्लास आणले होते. तिथेच असलेल्या स्टुलावर ठेवून काहीही न बोलता तो परत गेला.

     "तुला पिस्तूल दाखवायची काय गरज होती, त्या म्हाताय्राने पोलिसांना फोन-बीन केला तर?" विराजने अम्रेश ला विचारले. अम्रेश हसत म्हणाला, "अबे पागल है क्या? ईथे लाईटचा पत्ता नाही, दिव्यावर जगतोय तो म्हातारा. आणि फोन कुठून येणार? दारू पि साले.... और सो जा घोडे बेचके"

दोघानींही बाटली रिकामी केली. दिवसभर दमल्या मुळे त्या रूममधे सुध्दा त्या दोघानां लगेच गाढ झोप लागली.
दुसय्रा दिवशी सकाळी अम्रेशला जाग आली तेव्हा त्याचे हातपाय सुन्न पडले होते. रूममधे विराज आणि त्यांच्या बॅगचा पत्ता नव्हता. अम्रेशने बेडमधून उठण्याचा प्रयत्न केला. पण रात्री झोपून सुध्दा डोळ्यावरची झोप जाण्याच नाव घेत नव्हती. त्याने सगळी शक्ती एकटवून पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शरिरात त्राणच नव्हते. तेव्हाच दरवाजातून  रात्रीच्या म्हाताय्राने रूम मधे प्रवेश केला. अम्रेशला त्याच्या हातात असलेले ईजेक्शंन आणि औषधाची एक छोटीशी बाटली दिसत होती.

     "अरे, तुला जाग आली?" पांढरा फटक चेहरा पडलेल्या अम्रेशकडे बघत म्हातारा म्हणाला, "घाबरू नकोस, तुला काही होणार नाही. तुझा मित्र बाजूच्याच खोलीत आहे." सुई लावून त्याने अम्रेशच्या हातामधे ईंजेक्शन दिले. त्या ईजेंक्शनची जरा देखिल कळ त्याला हातामधे जाणवली नाही.

अम्रेशच्या कपाळावर घाम साचत चालला होता. रक्ताळलेल्या ओठांवर जिभ फिरवत म्हातारा म्हणाला, "पंचवीस वर्षापासून मी तहानलोय. तुम्ही यायला किती रे उशीर केलात."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...