HTML tutorial  मराठी   HTML tutorial HTML tutorial  HTML tutorial   HTML tutorial  HTML tutorial

रविवार, २४ जून, २००७

गुरुवार, ३१ मे, २००७

शनिवार, ३ मार्च, २००७

स्पदंन- ४

निकीची मम्मी सुधा देसाई डाईनींग डेबलावर भाजी निवडत बसल्या आहेत. त्याच्यांसमोर निकीचे पप्पा डॉ. अरुण देसाई काही पत्रे वाचत बसले आहेत. बाजूलाच त्याचीं बॅग आहे. कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहेत.
"मला जायला उशीर होतोय. डबा तयार झाला का ना नाही?"
"फक्त थोडा वेळ थांबा. भाजी शिजत आहे. लगेच होईल", मिसेस देसाई म्हणतात.
तेव्हढ्यात निकी प्रवेश करते. मुड नॉर्मल आहे.
मि. देसाई विचारतात, "काय मग, आज कोणाला रडवलसं?"
निकी थांबते, "अजुनतरी कोणालाच नाही, Don't worry, अजुन दिवस संपायचा बाकी आहे.”

तीच्या मागोमाग अनुष्का घरात प्रवेश करते.
“अजुन तु कुठे होतीस?”, निकी विचारते.
“कुठेतर नाही” अनुष्का म्हणते.
“हाय पपा”, अनुष्का पप्पांकडे Smyle करून म्हणते.
“हॅलो बेटा, So how was yours day?” मि.देसाई विचारतात.
“Fine, actually quite good.” अनुष्का म्हणते.
निकी बेडरूमकडे जाणाय्रा पायय्राकडे जाण्यासाठी वळते.
“निकी, हे तुझ्यासाठी आलयं.” मि. देसाई एक लिफाफा निकीच्या समोर धरतात.
निकी परत येऊन तो लिफाफा घेते. Address वाचुन म्हणते, "वाव! I think that मला एडमिशन मिळेल."
“पण मला वाटले कि तु ईथेच कॉलेजमधे शिकणार आहेस” मि. देसाई म्हणतात.
“तुम्हाला वाटले?” निकी प्रश्नार्थक चेहय्राने विचारते.
“पण पप्पा ती इथे हवीच कशाला?” अनुष्का मधेच नाक खुपसते.
निकी अनुष्काकडे डोळे मोठे करून पप्पानां म्हणते, “जरा.. हिला विचारा तरी कि ही घरी कशी आली?”
“भाजी तयार आहे” सुधा देसाई विषय बदलण्याचा प्रयत्न करतात.
“अनुष्का, whats the matter?, तु घरी कशी आलीस?” मि. देसाई विचारतात.
अनुष्का निकीकडे एक कटाक्ष टाकून म्हणते, “काही नाही पपा, कॉलेजमधला एक मुलगा होता,…………. सोबत पिया पण होती.”
मि. देसाई अजुन अनुष्काकडेच बघतायेत.
“पपा,… तो मला डिस्कोमधे जाण्यासाठी विचारत होता, ......So..... Can I .......?”
“what? sorry, no disco, no late night parties..... मी आगोदरच तुला सांगितले आहे. is that clear?”
“पण?” अनुष्काचा चेहरा पडला आहे.
“सांगितले ना.”
“आणि जर जायचेच असेल, तर तुझ्या दिदीला सोबत घेऊन जा. तरच……… Its for your own good”
“Oh common Pappa !, मी काही लहान नाही, आणि तसंपण निकी आणि Parties.... या जन्मातरी अशक्य.”
“हा हा हा” निकी हसून म्हणते
“That’s Enough! आजसाठी पुरेसे आहे. फ्रेश होऊन ममीची मदत करा, काय निकी?”
“येस पपा.” निकी म्हणते.
“तुमचा डबा तयार आहे.” मिसेस देसाई मि. देसाईच्या हातात डबा देत म्हणतात.
“तु पण जरा यांना सांगत जा.” मि. देसाई डबा आणि बॅग घेऊन बाहेर निघुन जातात.

क्रमक्षः

शनिवार, २४ फेब्रुवारी, २००७

स्पदंन- ३



मनिषा आणि निकी कॉलेजच्या एका शांत कोपय्रात बसल्या आहेत. दोघींच्या हातामधे पॉपकॉर्न सारखं काहीतरी आहे.
“तुझी बहिण विचीत्र आहे. मला वाटतं ती Shakespere कधीच वाचणार नाही, तीला त्या बद्दल काहिच माहीत नाही”
निकी देखिल हल्ला चढवते, “मनिषा, प्रॉब्लेम हा आहे कि तु जिम सोडून Shakespere ला अटेन्ड करते आहेस, मला विचारशील तर, हा फक्त वेडेपणा आहे बस!”
बोलत असतानाच निकीचे लक्ष राकेशकडे जाते. तो त्याच्या मित्रांसोबत सिगरेट पेटवत चालला आहे. तीच्या बघण्याकडे मनिषाचे लक्ष जाते.
“तो कोण आहे?” ,मनिषा विचारते.
“राकेश शहा”
“तो शहा आहे? गेल्यावर्षी तर तो गायब होता ना. कुठल्यातरी बियरबार मधे ड्रिक्स सर्व करत होता म्हणे.”
“चला, वर्षभरात कोणीतरी intresting काम केले. नाहीतर ईथे......” ,निकी हसून म्हणते.
“रोमिओ ऍन्ड ज्युलिएट फिल्म मधे लिओ देखिल असाच दिसतो.” मनिषा कुठल्यातरी जगात हरवून म्हणते.
“काय?”
निकी मनिषाकडे बघायला लागते, स्वःताच्या पॉकेटमधले पॉपकॉर्न तीच्या हातामधे कोबूंन म्हणते, “मनिषा संपवून टाक, उपाशी राहून राहून, तू मरायला टेकली आहेस.”
“हा, थोडीफार.” मनिषा ते पॉपकॉर्न संपवायला लागते. निकीला तीच्या हातावर एक जखमेचा व्रण दिसतो.
“हे काय झालं?”
“काही नाही, मीच केले.”
निकी तिच्याकडे निर्वीकार चेहय्राने बघत म्हणते, “मनिषा, मला माहित आहे, या कॉलेजमधे मुलं कमी होत चालली आहेत, पण स्वःताला ठार करून रोमिओ ज्युलीऍटच्या सोबत राहण्याचे स्वप्न तुझ्या वयाच्या मुलीला शोभत नाही.” पुन्हा राकेशकडे नजर फिरवून म्हणते, “तुला वेड्याच्यां हॉस्पीटलमधे भर्ती करायला हवे. पण त्याला देखिल खुप खर्च येईल.”
“पण त्यानीं एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल जरा विचार कर ना”.
निकी क्षणभर विचार करून म्हणते, "ठिक आहे, जा मर, आणि हो अमर"
मनिषाचे अनुष्का कडे लक्ष जाते. ती आणि पिया, अजित आणि त्याच्या मित्रांमागे परेड करत आहेत. एकजण अजितच्या खाद्यांवर हात ठेवतो,
"अजित"
अजितला ईशारा समजतो, तो अनुष्काकडे बघुन स्माईल देतो,
“हाय गर्ल्स!”
अनुष्का लाजुन स्माईलची परतफेड करते. पाठिमागे निकी आणि मनिषा अजुनही त्यांच्यावर नजर ठेऊन आहेत.
"छे, काहितरीच" मनिषा म्हणते.
निकी काहीच प्रतीक्रिया देत नाही. दुसरीकडे मनिष आणि प्रशांत देखिल अनुष्का आणि अजितकडे लक्ष ठेऊन आहेत.
प्रशांत विचारतो, “मुलीनां नेहमी अशीच मुलं का आवडतात?”
“Because,….. त्या जन्मजातच तश्या असतात, त्याच्यां आईला देखिल तशीच मुलं आवडत होती, आणि त्याच्यां आजीला देखिल. U know what, जिन्समधे Changes क्वचीतच दिसून येतात.”
“आणि नेहमीच काय तो दात दाखवत असतो?”
“अजित?, मिस्टर, तो स्मार्ट आहे, क्लास मधे हुशार आहे, आणि मॉडेलींग देखिल करतो. एकिवात आलयं की त्याची कुठल्यातरी सॉक्सची ऍड येणार आहे.”
कॉलेजची बेल वाजते, सर्व ग्रुप वेगवेगळे होतात. प्रशांत आणि मनिष देखिल जाण्यासाठी उठतात, त्याचवेळेस प्रशांत दुरुनच अनुष्काची एक झलक मिळवण्याचा प्रयत्न करतो.
" अरे प्रशांत, तुला संस्कृत येत का?", मनिष विचारतो.
"off course येतं. मी संस्कृत मधे बेस्ट आहे. सातवी पासून शिकतोय."
"Wow, thats good. तुला माहीत आहे, कॉलेजमधे अनुष्काचा संस्कृत साठी नविन टिचर कोण आहे?"
"कोण?"
"तु. अजुन कोण?"
"What do you mean by that?"
"Listen, अनुष्काने तीच्या Subjects मधे संस्कृत विषय घेतलाय, तु अनुष्काला संस्कृत शिकण्यासाठी मदत कर, त्याच सोबत तु तिच्यावर Concentrate देखिल करू शकतोस. समजलंना what I waana to say?"
"तुला वाटतं, हि आयडीया काम करेल?"
"ट्राय करायला काय हरकत आहे. एक Start तर मिळेल."

++

कॉलेजच्या पार्किगं लॉटमधे, निकी आणि मनिषा निकीच्या बाईककडे चालल्यात. अजित त्याच्या कारची ग्लास खाली करून म्हणतो, "हाय निकी"
निकीताचा क्लासमधील राग अजून नाकावर आहे. तरिही ती कार शेजारी थांबते.
"काय आहे, लवकर बोल"
"काही नाही, पण आजकाल तु अशी का दिसतेस? मेकअपचे सगळे सामान बाजारात विकले का?"
"नाही रे, दान केलं, पण तुला कसे कळले? Actually मला तुझा एक राईट फुट सोडला तर तुझात स्मार्ट म्हणण्यासारखे काहीच दिसत नाही…….. कठीण आहे."
अजितची कार सोडून निकी आणि मनिषा बाईककडे जातात.
"काय मुर्ख लोक भरलीत या कॉलेजमधे.", निकी म्हणते.
"तु नेहमी माझ्यासोबत रहात जा. मला खात्री आहे, शेक्स्पिअरचे काही स्मार्ट मित्र असतील.", मनिषा म्हणते.
त्यानां अजितची कार अनुष्का आणि पियाच्या बाजुला Slow होताना दिसते. त्या दोघी कॉलेजच्या बसस्टॉपकडे चालल्यात.
"लिफ्ट?", अजित विचारतो.
अनुष्का आणि पिया त्याच्या कारमधे बसतात. अजित निकीला चिडवण्यासाठी एक स्माईल देऊन कार चालू करतो.. मनिषा तीचा चष्मा काढून निकी कडे बघते, “निकी, आता हे काय नवीन सुरू झालयं.”
निकी काहीच बोलत नाही. बाईकवर बसून जोरदार किकमधे बाईक सुरू करते, आणि स्पिडमधे मेनरोडकडे जायला निघते, तेव्हड्यात मनिष बाईक समोर येतो, निकी जोरात ब्रेक लावते, मनिषची सायकल अपघातापासून थोडक्यात बचावते.
“Idiot, दिसत माही का?” निकी त्याच्यावर भडकून म्हणते.
मनिष बिचारा कसेतरी पेडल मारत बाजूला होतो.
“Are you all right?” प्रशांत त्याच्या बाजुला येऊन विचारतो.
“Ya, Thank God, थोडक्यात बचावलो.”
“एक सांग, ती अनुष्काची सिस्टर होती का?”

स्पदंन- २



Physics लेक्चर चालू आहे. क्लासमधे बोअर झालेले काही सिनीअर स्टुडन्टस् चव्हाण मॅडमच्या दहशतीखाली चित्रकलेची प्रॅक्टीस करतायेत. पहिल्या ओळीतील स्टुडन्टस् मॅडमपासुन सुरक्षीत अतंर ठेऊन त्या काय म्हणतायेत हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतायेत.
“ठिक आहे, मला वाटते Newoton’s Law of Motion ची थेअरी Complete झाली आहे. Do You have any other Questions?” रुक्ष आवाजात मिसेस चव्हाण क्लासला म्हणतात.
“Yes निक्की ?”
"आपण जॅकी चान किवां ब्रुसली बद्दल का नाही Study करत?” ,निकी शातं आवाजात विचारते.
“I'm sorry?” ,मॅडमनी निट एकलं नाहीये.
“Clearly सांगायचे झाले तर मला Newtonचा कटांळा आला आहे. त्याच्या डोक्यावर Apple पडले म्हणुन दरवर्षी आम्हाला डोकेदुखी कशासाठी? 4th Standard पासुन आम्ही तेच तेच शिकतोय. तुम्हाला माहीत आहे का, ब्रुसली एक ईचं अतंरावरून जोरदार पचं करू शकत होता, या मागचे Physics काय आहे, ते तुम्ही का नाही शिकवत?"
क्लासमधला एक स्मार्ट कॅटेगरीतला विद्यार्थी- अजित कदम, त्याला विनोद करण्याची लहर येते, तो दबलेल्या आवाजात म्हणतो, “ब्रुसली Physics चं लेक्चर कधीपासुन अटेन्ड करायला लागला?” थोडीफार हस्याची खसखस विद्यार्थ्यांमधे पिकते. निकी त्याच्याकडे लक्ष देत नाही. नेहमीची सवय.
पण मिसेस चव्हाण मात्र भडकल्यात, "That's enough, Mr. Ajit Kadam.”
Ya, खरोखरच भडकल्यात.
पण निकीचे न्युटनपुराण चालूच आहे. “मला वाटतं स्कुल बोर्ड याबद्दल जरूर विचार करेल, Don’t you think that न्युटन आमचा time waste करत आहे.”
ती चव्हाण मॅडमकडे बघते त्याचां चेहरा आता लाल व्हायला लागला आहे.
"तु आताच्या आता काउन्सलरच्या ऑफिसमधे जा." मॅडम ऑर्डर सोडतात.
निकी नोटबुक बदं करून क्लासच्या बाहेर निघुन जाते.
++
निकी आता कुलकर्णी मॅडमच्या समोर बसली आहे. मॅडम नेहमीच्याच सुरात बोलायला लागतात, “देसाई, तु आज पुन्हा मिसेस चव्हाणांच्या क्लासमधे गोंधळ घालत होतीस.”
“मी स्वःताचे मत व्यक्त केले तर तुम्ही गोंधळ घातला, कसे काय म्हणू शकता?”
“हा, बरोबर आहे, तसेपण पुर्ण वर्षभरातील तुझे कारनामे बघता आजचा event खुपच शुल्लक होता. By the way, May be तुला हे जाणुन घेण्यात interest वाटेल कि अमर गुप्ताच्या पायाचे ऑपरेशन ठिकठाक झालेय.”
“Listen Mam, त्याने स्वःताच बास्केटबॉलला चुकिच्या पध्दतीने kick केले होते. And at same time I was only there.”
“हे बघ निकी, The point is लोक तुला असं समजायला लागलेत कि......”
निकी तीच्याकडे पाहून स्माईल करते, मॅडममधे बोलण्याची किती हिम्मत आहे त्याची वाट बघतेय. मॅडम विचार करत राहतात.
“कडकलक्ष्मी, हा?” निकी मॅडमची मदत करते.
“हा असंच काहितरी” चितांग्रस्थ चेहय्राने मॅडम म्हणतात “I Hope, You will think about it.”
खुर्चीतून निकी उठते, दोघीच्यां चेहय्रावर सारखेच ओढुन-ताणून आणलेले Smyle आहे.
“Thanks for your excellent guidance.” असे बोलून निकी बाहेर येते.
++
सेकन्ड ईअरच्या क्लासमधे टिचर काहितरी गुणगूणत फळ्यावर मोठ्या अक्षरात नोटस लिहून देत आहेत. अनुष्काचे तिकडे लक्ष नाही. केसानां एक झटका देऊन ती पियाकडे एक चिठ्ठी पास करते. पिया नोट उघडून वाचते- ' आज हॉलमधे अजितने मला Hi! केले!'
पियाच्या चेहय्रावर नाराजीचे भाव उमटतात. टिचरनी ते बघीतलयं, त्या अनुष्काकडे पाहुन बोलायला लागतात, "मिस अनुष्का, आतापर्यंत तु क्लासमधे काय स्टडी केलयं, ते जरा Explain करशील का?”
अनुष्का वर बघते आणि पप्पाचीं लाडकी मुलगी असल्यासारखे Cute Smyle देते.
“Actually,……. नाही”, अनुष्का म्हणते.
टिचरकडे काहीही उपाय नाही, त्या फक्त डोकं हालवून एक सुस्कारा सोडतात. मनिषा, क्लासमधली एक अनाथ दिसणारी मुलगी, हात वर करते.
“मनिषा, तु सांग क्लासमधे आपण काय काय शिकलो आहोत. मला आशा आहे, तु तरी Shakespere निट वाचले असशील.”
“हा, मी वाचलंय, Each & Every Page.”
“काय? सगळं पुस्तक?”
“हा सगळं पुस्तक.”
“तुला म्हणायचे आहे, तु Shakespereचे पुस्तक पुर्ण वाचले आहेस”, टिचरनां विश्वास वाटत नाही.
“तुम्ही नाही वाचलतं?”, मनिषा भुवया उंचावून विचारते. टिचरकडे ऊत्तर नाही, त्या दुसय्रा स्टुडन्ट कडे वळतात.

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २००७

स्पदंन



जे.एस्.एम्. कॉलेज मधे तुमचे स्वागत आहे. या कॉलेजमधे तुम्हाला हुशार, खेळाडू, पराक्रमी, बोअर करणारे, एकटे राहणारे आणि रोमीओचा वारसा चालवणारे असे सर्वप्रकारचे विद्यार्थी आढळतील. यामधील काहीजण कारमधुन, काही बाईकवर, काही दाडींयात्रा करत पैदल, काही ट्रेन चे धक्के खात तर काही बसमधुन येतात.
याच कॉलेजमधे निकीता देसाई ऊर्फ निकी देखिल शिकते, एकोणीस वर्षाची, स्मार्ट, सुदंर मुलगी पण तीच्या सुदंरतेची तारिफ करायला कॉलेजमधील कोणीही धजावत नाही.
आज सकाळची वेळ आहे आणि निकी नेहमीप्रमाणे तीच्या बाईकवरून ऊतरते. Actually ती बाईक मुलीऐवजी एखाद्या मुलालाच जास्त शोभेल. पण निकी मात्र त्याला अपवाद आहे. ब्लॅक जॅकेट, ब्ल्यु जिन्स, हातात तीन बूक्स, काही पेन्स वैगेरे. नेहमीच्या पेहरावात स्वारी क्लासकडे चालली आहे, तेवढ्यात एक ज्युनीअर मुलगा हॉलीबॉलच्या नादात निकीला धक्का देतो. तो मुलगा मदत करायला जाणार, पण कोणाला धडक मारली आहे हे बघूनच तो......
"हे.... सॉरी"
तो घाबरतच तीच्या पडलेल्या वस्तू उचलायला लागतो.
"पळ इथुन", निकी म्हणते.
तरिही तो पडलेल्या वस्तू उचलत बसतो.
"सांगितले ना, पळ इथुन." निकीचा मुड खराब झालाय.
निकी त्याचा हॉलीबॉल घेऊन झटकन त्याच्या समोर आणते जणूकाही त्याच्या चेहय्राचा हॉलीबॉल करण्याच्या विचारात आहे. तो बिचारा गपचूप आपला बॉल घेतो, आणि ती त्याला जाऊ देते. जसजशी ती क्लासकडे जाते ईतर स्टुडंटसच्या नजरा तीचा पाठलाग करतात. दरवाजाला एक जोरदार धक्का देऊन ती क्लासमधे प्रवेश करते.
++
याच कॉलेजमधे अनुष्का देसाई नावाची परी देखिल शिकते, निकीताची छोटी बहीण. ती आणि तीची मैत्रिण पिया जास्त वेळ गर्ल्स-रूमच्या आरश्यासमोर घालवणे पसंत करतात. आता देखिल त्या आरश्यासमोरच आहेत.
बराचवेळ तिथे गेल्यानतंर क्लासची आठवण येते. गर्ल्स रूमच्या बाहेर येताच गर्दी अनुष्काला ‘हाय, हॅलो’ करायला लागते. त्या गर्दीत मुलांच्या सोबत मुली देखिल आहेत.
“हाय अनुष्का” ,एक मुलगा म्हणतो.
“ड्रेस छान आहे”, गर्दीतील एक मुलगी म्हणते.
तर कोणी लिपस्टीक ची तारिफ करते.
हाय, हॅलो चा सिलसीला चालू राहतो, फक्त अनुष्कासाठी, पियाकडे कोणाचेच लक्ष नाही. खुपजण अनुष्का सोबत जवळीक् साधायचा प्रयत्न करतात. अनुष्का तीच्या फॅन्सकडे बघून स्माईल फेकत क्लासकडे जाते.
++
प्रशांत साठे, एक हॅन्डसम, सरळमार्गी सिनिअर आणखी एका स्टुडन्ट सोबत, कॉलेजमधील गाईडन्स काउन्सलर, कुलकर्णी मॅडम समोर बसला आहे,
"मला वाटतं कि हे कॉलेज तुझ्या जुन्या कॉलेजपेक्षा काही वेगळे नसेल, घर सोडून ईथे टाईमपास करणारे मुलं खुप आहेत", या वाक्यासोबत एक क्रूत्रीम हस्य तीच्या चेहय्रावर बघुन प्रशांतला त्या खुर्चीत बसुन अस्वस्थ वाटायला लागते.
“Any questions?” मॅडम विचारतात.
“नाही मॅडम, काही नाही,” प्रशांत म्हणतो.
“तर मग क्लास मधे जा, लवकर, मला आजच्या उद्योगी मुलांचे उद्योग बघायचे आहेत”, मॅडम म्हणतात.
प्रशांत जाण्यासाठी उठतो तोच, राकेश शहा, एव्हरेज सिनीअर पेक्षा जास्त वय असणाय्रा मुलाशी त्याची नजरानजर होते, तो कुलकर्णी मॅडमच्या ऑफिसबाहेर कशाचीतरी वाट पाहतोय. त्याचे शरिर आणि स्माईल पाहूनच अदांज येतो कि तो किती 'कुल' असेल.
कुलकर्णी मॅडम हातातल्या रिपोर्ट-फाईलकडे बघतात नतंर राकेशकडे," राकेश शहा, मला वाटते आपली भेट वारंवार व्हायला लागली आहे"
“मला नेहमी तुमची आठवण येते”, राकेश म्हणतो.
“मला एकिवात आले आहे तु कॅन्टीन मधे फ्रेशर गर्ल्स समोर कपडे काढुन मसल्स दाखवत होतास.”
“माझ्या कपड्यांवर सॉस पडलं होतं, लन्च करताना.”
“लन्च हं? तुम्ही टिश्युपेपर एवजी शर्ट कपडे कधीपासून वापरायला लागलात?”
++
प्रशांतला तिथे थांबण्यात काहिच अर्थ वाटत नाही, दरवाजाबाहेर येतो आणि त्याची गाठ मनिष लाड -एक सडपातळ, हुशार सिनीअरशी पडते. कॉलेजमधे सर्वांचें मत आहे कि मनिष एखादा नेता, किवां एखादा शो होस्ट बनेल.
“तु नविन आहेस ना?” मनिष विचारतो.
“मलापण असेच वाटते”, प्रशांत म्हणतो.
“ठिक आहे, चल मी तुला कॉलेज दाखवतो”, मनिष म्हणतो
ऑफिसच्या कॅरिडोर मधुन ते बाहेर पडतात.
“तर, तु आगोदर कुठल्या जंगलात रहात होतास” मनिष विचारतो.
“मी, आगोदर कोल्हापुर मधे होतो. पण तु...?”
“It was a joke. पण तीथे खरोखर माणसं रहातात?”
“हा, थोडीफार. पण माणसांपेक्षा गाई जास्त आहेत.”
“तुझ्या जुन्या कॉलेजमधे किती माणसे होती?”
“बत्तीस”
“ए जा ना!”
“ईथे किती असतील?”
“हजार! त्यातील बहुतेक शैतान आहेत”, मनिष म्हणतो.
++
“ईथे काही Good Looking लोक आहेत्, तु जोपर्यंत सुरवात करत नाहीस तो पर्यंत ते तुझ्याशी बोलणार नाहीत, लाजू नकोस!”
त्यांच्या बाजुने एक सुदंर मुलीचां ग्रुप जातो.
“तो स्पोर्ट्स टिमचा ग्रुप आहे.” टिशर्ट, स्पोर्ट्स शुज घातलेला एक ग्रुप स्वःतातच मशगुल आहे.
“मी देखिल टिममधे होतो” ,प्रशांत म्हणतो.
“हा, पण त्यानीं अजुन कधीच कुठली मॅच जिंकली नाही, यावर्षी त्याचीं दुसरे काहीतरी करण्याची ईच्छा आहे.”
जसजसे ते पुढे जातात, त्यानां कॅन्टीन जवळ एक ग्रुप दिसतो.
“हा फुकट्या मुलांचा ग्रुप, त्याच्यांसोबत जरा सांभाळूनच रहा.”
++
ते कॉलेज बिल्डींगच्या बाहेर येतात.
मनिष प्रशांतला College-Trip करवत आहे. अजुन काही ग्रुपची ओळख करून देतो. एका घाबरट मुलाकडे, ईशाराकरून मनिष ओरडतो, " अरे संयोग, लन्चसाठी पण काही ठेऊन दे…. माझा भाऊ आहे, एकदम शातं.”
कॅन्टीनकडे जाताना प्रशांत मनिषला विचारतो, "तु या सर्वांमधे कुठे फिट बसतोस?"
ते कॅन्टीनमधे प्रवेश करतात. कॅन्टीनमधे म्युझीकच्या आवाजा सोबत गर्दी देखिल आहे.
"भविष्यातला बिजनेसमेन. माझ्यासारखे अजुनही काही आहेत. एकेदिवशी मी मॅनेजर असेन आणि त्यावेळेस हि सर्व मुलं...."
तो टेबलाच्या बाजुला घोळका करून बसलेल्या मुलांकडे ईशारा करत म्हणतो, "मला साहेब म्हणतील. & There he is, अनिल, माझा मित्र आहे."
प्रशांतला काहिच एकायला येत नाही, कारण अनुष्का त्याच्या बाजुने जाते, तसं प्रशांत आणि मनिषकडे ती एकदाही पहात नाही. पण प्रशांत मात्र वेड्यासारखा तीच्याकडे पहात रहातो.
“ती मुलगी... मी...” प्रशांत बडबडायला लागलाय.
“झाले, हा पण हारवला.” मनिष म्हणतो.
“ती कोण आहे?”
“अनुष्का देसाई. तीच्याबद्दल विचार सोडून दे.”
“का?”
“का?...... राजा मला तुझ्या हेअरकट पासुन सुरवात करायला लागेल, पण त्याचा देखिल काहीच उपयोग नाही. तीची मोठी बहिण कॉलेजमधे आहे, तो पर्यंत तरी नाही.”

शनिवार, १० फेब्रुवारी, २००७

खारट कॉफी

प्रथम तो तीला एका पार्टीमधे भेटला, ती ईतकी सुंदर दिसत होती की खुपजण तिच्यासोबत जवळीक साधायचा प्रयन्त करत होते, तो मात्र शांत होता. कुणाचेच त्याच्याकडे लक्ष नव्हते. पार्टी संपत आली होती आणि त्याने तिला त्याच्या सोबत कॉफी पिण्यासाठी आमंत्रीत केले. प्रथम तिला आश्चर्य वाटले, पण त्याने सभ्यपणाने विचारले असल्याने तिनेही येण्याचे अश्वासन दिले. ते एका छानश्या कॉफी शॉप मधे बसले, पण त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तिला देखिल बोअर व्हायला लागले होते, विचार केला लगेच घरी निघून जावे. अचानक त्याने वेटरला विचारले, क्रुपया मला थोडेसे मिठ मिळेल का? मला कॉफीसोबत हवेय. हॉटेलमधे असलेला प्रत्येकजण त्याच्याकडे बघायला लागला होता, काय विचीत्रपणा! त्याला देखिल कसेतरीच वाटले, पण तरिही त्याने स्वःताच्या कॉफीमधे मिठ टाकून ते पिऊन टाकले.

तिने त्याला कुतूहलाने विचारले: तुला, असा हा छदं का आहे?

त्याने ऊत्तर दिले: जेव्हा मी लहान होतो, मी समुद्र किनारी रहायचो, मला समुद्रात खेळायला आवडायचे. मला आता देखिल तो अनुभव मिळतो, खारटसा, ......... मिठ टाकलेल्या कॉफीसारखा. आता जेव्हा कधी मी खारट कॉफी पितो, मला माझे बालपण आठवते, माझे लहनपणीचे घर आठवते. मी त्यानां खुप miss करतो. मी माझ्या आईवडलांना miss करतो, जे अजुनही तेथेच राहतात. हे बोलताना त्याच्या डोळ्यात आसवे उभी राहिली होती.

तिच्या मनाला हे खुपच खोलवर परिणाम घडवून गेले. त्या त्याच्या खय्रा भावना होत्या, ह्र्दयाच्या खोलातुन आलेल्या. असा व्यक्ती जो आपल्या घराबद्दल असे विचार असतील, त्याला नक्कीच घराबद्दल काळजी असेल, ईतरांबद्दल काळजी असेल. त्यानंतर तिनेही बोलायची सुरवात केली, तिच्या दुर असलेल्या घराबद्दल, तिच्या बालपणाबद्दल, तिच्या Parents बद्दल.

त्यांची बातचीत खुपच छान झाली, त्याच बरोबर त्याच्यां कथेची सुरवात देखील.

त्यानतंर त्यानी वारंवार भेटणे चालूच ठेवले. त्याच्याप्रमाणे तिला देखिल तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटला होता. सर्वच बाबतीत तो तिला सुट होत होता...... एक असा व्यक्ती ज्याला ती कधीपासूनच शोधत होती.! Thanks to his salty coffee!

त्यानतंर त्याचीं कथा प्रत्येक परीकथां प्रमाणेच झाली. राजकुमाराने राजकन्येशी लग्न केले, आणि ते सुखी झाले.... आणि, जेव्हा कधी ती त्याच्यासाठी कॉफी बनवत असे, त्यामधे थोडेसे मिठ टाकत असे.... कारण त्याला आवडते.

चाळीस वर्षानतंर, तो तिला सोडून गेला, कायमचाच. तिच्यासाठी एक पत्र लिहून ज्यामधे लिहले होते: प्रिये, क्रुपया मला माफ कर, माझ्या जिवनभरातल्या एका खोटेपणासाठी. तुझ्याशी मी फक्त एकदाच खोटे बोललो.... खारट कॉफी. आठवतेय.

आपण प्रथम भेटलो होतो. मी त्यावेळेस इतका nervous झालो होतो, खरतर मला साखर हवी होती.

पण मी मिठ मागीतले. त्यानंतर मला ते नाकारणे खुपच कठीण वाटले, त्यामुळे मी ती कॉफी पिऊन टाकली. मला कधीच असे वाटले नाही की, ती आपल्या नात्याची सुरवात असेल. मी तुला खरं सांगण्याचा खुपदा प्रयत्न केला, पण नाही सांगु शकलो, मी तुला वचन दिले होते, तुला कधीच फसवणार नाही.... आता मी मरत आहे. मला आता कशाचीच भिती वाटत नाही, म्हणुन तुला खरं सागंतो आहे. मला कधीच खारट कॉफी आवडली नाही. खुपच खराब चव असते..... पण तु माझ्या जिवनात आल्या पासुन मी खारट कॉफी पित आहे. तु माझ्या सोबत आहेस हिच माझ्या जिवनातली सर्वात आनंदाची गोष्ट आहे.

जर मला पुन्हा जिवन लाभले, तरी मला तुच हवी असशील, जरी त्यासाठी मला पुन्हा खारट कॉफी प्यावी लागली तरी.

.......तिच्या अश्रुनीं ते पत्र पुर्णपणे भिजले होते.



एकेदीवशी, कुणीतरी तिला विचारले: खारट कॉफी कशी असते?

‘गोड’..... तिने ऊत्तर दिले.

सोमवार, ८ जानेवारी, २००७

ती बसमधली

नविन वर्ष आले कि मला एक १९९८ ची घटना आठवते. तेव्हा मी कॉलेज साठी बसने प्रवास करायचो. तर तीची आणि माझी पहिली भेट ३०-१२-१९९८ ला (मला तारखा बरोबर लक्षात राहतात) बसस्टॉपवर झाली. सध्यांकाळी बस नेहमीप्रमाणे लेट झाली होती. ती तीच्या मैत्रीणींसोबत कॉलेजमधुन घरी जायला आली होती. बहुदा हॉस्टेल मधे त्या रहात असाव्यात आणि न्यु-ईअर सेलिब्रेशनसाठी तिच्या घरी जात असाव्यात. बसस्टॉपवर आणि नतंर बसमध्ये तीच्या व माझ्या ग्रुपचे एकमेकांवर कमेन्टस् सारखे चालूच होते. माझा स्टॉप आल्यावर मी माझ्या मित्रांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्या म्हणजे जोरात ओरडून दिल्या, जेणेकरून त्या तीच्या ग्रुपपर्यंत देखिल पोहोचल्या.
नतंर एक आठवड्याने ती पुन्हा बसमध्ये दिसली. या वेळेस एकटीच होती. माझ्या एका मित्राने कन्डक्टर कडून सहजतेने तिच्या स्टॉपचे नाव काढून घेतले.
तीची तिसरी भेट मकर सक्रातींच्या दिवशी झाली. माझ्याकडे तिळगूळ होते. आणि आमचा तिळगुळ समारंभ बसमध्येच सुरू झाला. बसमध्ये इतरांसारखेच तिचेही तोडं गोड केले. इतके होऊन आमच्यामधे संभाषण नावाची कोणतीही गोष्ट नव्हती.
आमची चौथी भेट त्यानतंर आठवड्यानेच झाली. आता मला देखिल समजायला लागले होते कि ही दर शनिवारी तिच्या घरी जाते. त्यादिवशी मी व माझा मित्र तिच्या समोरच्याच सिटवर जाऊन बसलो. तेव्हा ती फिल्मफेअर मॅगेझीन मधे डोके खुपसुन बसली होती. बस सुरू झल्यानतंर पाच मिनीटाने माझ्या मित्राने ते तिच्याकडून मागुन घेतले आणि तीने माझ्याकडचा मिड-डे घेतला. आणखी पाच मिनीटे गेल्यावर ती तीच्या पायाने माझ्या पायानां चाळा करायला लागली. प्रथम मला वाटले चुकून पाय लागला असेल, पण पाच मिनीट गेली, सात गेली, दहा गेली, तरी हिचे कामचालूच होते. बर मी तीच्याकडे बघीतले की ती नजरेला नजरही द्यायला तयार नव्हती. थोड्या वेळाने मी न राहऊन तीला विचारले- काय ग! लाथा कशाला मारतेस.
त्यावेळेस त्या बिचारीने झालेल्या फजितीबद्दल सॉरी बोलून काम निभावले.
मला नतंर वाटले कि तीची अशी फजिती करायला नको होती. परत ती मला बस मध्ये कधीच दिसली नाही.
तिन वर्षे गेल्या नंतर ती पुन्हा एकदा दिसली. माझ्या कझनचे लग्न तिच्या शहरातच होते. तेव्हा ति तिच्या आईसोबत आली होती. तीची आई मला शाळेत मी सहावीला असताना शिकवायला होती. मी त्यानां जुनी ओळख दाखवल्या नतंर त्यानींही जरा गप्पा मारल्या. ती देखिल आमच्या सोबतच होती पण अबोलच. थोड्या वेळाने तीच्या आईचे लक्ष नाही पाहून मी त्या बसमधल्या प्रसंगाबद्दल तीला सॉरी बोललो. तर ती हसायला लागली. म्हणाली- ते आठवल्यावर मलाही देखिल खुप हसायला येते. आणि आम्ही दोघेही खळखळून हासलो. नतंर पुन्हा कधी तीची भेट झाली नाही.

मंगळवार, २ जानेवारी, २००७

मी आणि तू

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतो

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देतो की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल

.....प्रसिक

मुम्बई विद्यापिठ आणि ईंजिनीअरीगंचे विद्यार्थी

मुम्बई विद्यापिठ आणि ईंजिनीअरीगंचे विद्यार्थीमुम्बई विद्यापिठ हे १५० वे वर्ष साजरे करते आहे. त्या निमीत्ताने लिहलेला हा लेख मी मुम्बई विद्यापिठाला व तेथे शिकणाय्रा असंख्य अभियात्रिंकीच्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो.
जर तुम्हाला वाटत असेल कि ईंजिनीअरीगं चे विद्यार्थी साहीत्यांमधे कमकूवत असतील तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. पुढील शायरी वाचा, तुमचा हा गैरसमज नक्कीच दुर होईल...............
वो बाप हि क्या जिसकी बेटी नही
वो ईंजिनीअर हि क्या जिसकी केटी नही.
एक बार में पास हुआ तो क्या किया,
बिना फेल हुये जिया तो क्या जिया
ईंजिनीअर कॉलेजमें ईतने साल मरते है,
कभी कभी तो बाप और बेटे एक ही क्लास में पढते है.

वरील ओळी काही जणांना अजब वाटतील, पण ह्या आणि अशा कित्येक ओळी मुम्बई विश्वविद्यालयाच्या ईंजिनीअरिंग विद्यार्थ्यांच्या जिवनात काही सुखाचे क्षण निर्माण करतात. प्रथम वर्षाच्या दुसय्रा सेमिस्टरला नापास होण्याची प्रथा यावर्षी देखिल ६५% हुन आधीक विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. येथे मी विद्यार्थ्यांकडे भेदभाव न करता सुचीत करू ईच्छीतो कि ईंजिनीअरीगं चे विद्यार्थी हे बारावीला सरासरी ८०% गुण ( अपवाद फक्त बडे बाप के बेटे जे प्रवेश बाप की मेहनत की कमाई वर घेतात व नापास होऊन कॉलेजमधून बाहेर पडतात.) मिळवून प्रवेश मिळवतात. तरिही पास होणं अभावानेच आढळते. मग हे ईंजिनीअरीगं आहे तरी काय. विद्यार्थी नापास का होतात? विद्यार्थी आभ्यास करत नाहीत हा मुद्दा मान्य न करण्यासारखा आहे, कारण जो विद्यार्थी बारवीला ८०% ते ९०% मार्कस् काढतो त्याला अभ्यास कधी व कसा करावा हे सांगण्याची गरज मला तरी नाही वाटत. मग दोष कोणाला द्यावा? मुम्बई विश्वविद्यालयाच्या माजी ईंजिनीअरिंग विद्यार्थी असल्या कारणाने मला हा लेख लिहावसा वाटतो.

विश्वविद्यालयः
१. विद्यार्थ्यांचे वर्ष हे जुन महीन्यात सुरू व्हावे हि अपेक्षा असते, पण १५ ऑगस्टच्या आगोदर कॉलेजकडे कुत्रं देखिल फिरकत नाही. कॉलेज दरवर्षी १ ते २ महीने ऊशीरा सुरू होते, कारण लेट ऍडमिशनस्, कोर्टाची स्थगिती, मेडीकल एन्ट्रनस् आणि असेच बरेच काही. ऑगस्टमधे कॉलेज सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांकडून डिसेबंरच्या पहील्या आठवड्यात पहील्या सत्रासाठी परिक्षेला बसण्याची अपेक्षा केली जाते. फक्त दोन महीन्यांनतंर परिक्षेला बसण्यापुर्वी विद्यार्थ्यांकडून पुढील बाबींची पुर्तता परिक्षेपुर्वी करण्यास सांगण्यात येते.
अ. कमीतकमी पाच विषयाच्या प्रात्यक्षीक व त्याचे जरनल (त्या विषयाच्या टिचर-ईन-चार्ज कडुन सर्टीफाय केलेल्या असाव्यात) पुर्ण लिहून सबमीट करायचे असते. या सोहळ्याला सबमिशन असे नाव दिले गेले आहे. खरोखरच ते एखाद्या मिशन पेक्षा कमी नसते.
ब. प्रत्येक विषयाच्या कमीत-कमी तीन असायनमेन्टस् त्या सुध्धा दिलेल्या वेळेत पुर्ण करून. असायनमेन्टस् म्हणजे अश्या प्रश्नांचा संच जो विद्यार्थ्यांकडून अ-४ च्या कागदावर ऊत्तर लिहून पुर्ण केला जातो. प्रश्नाची संख्या हि प्रत्येक शिक्षकाच्या स्वभावावर अवलंबून असते, पण शक्यतो ती जास्तच ठेवली जाते. वर्गातले काही किताबी किडेच ते सोडवतात आणि ईतर् छपरी पोरे त्याची नक्कल उतरवतात. त्यामुळे ईंजिनीअरीगं चे विद्यार्थी जर तुम्हाला ट्रेनमधे, बेस्टचा बसमधे अथवा रेस्टारंट मधे काही लिहताना दिसले तर आश्चर्य करण्याचे काहिही कारण नाही. तुम्ही कधी ७:२७ च्या अधेंरी-बेलापुर लोकलने कधी प्रवास केला आहे का? जर नसेल तर एकदा करूनच् पहा. जे भेटेल त्याचा आधार घेऊन ईंजिनीअरीगं चे विद्यार्थी त्यांचे असायनमेन्टस् खरडताना दिसतील.
क. त्यानंतर कमांक लागतो तो म्हणजे क्रॅश कोर्स मालिका, काही स्टुडन्टस कोचींग क्लासला जातात त्यांना पुर्वतयारी करायला लागते ( सर्वच गोष्टींची ), कारण बहूतेक कॉलेज त्यांच्या अभ्यासक्रमात खुपच मागे असतात.२. परिक्षेचे वेळापत्रक कधीच नियमीत नसते. हे कदाचीत एकण्यास नवीन नसावे, परिक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आगोदर देखिल पुढे ढकलल्या जातात! सर्वात वाईट द्रुश्य म्हणजे परिक्षा प्रिपोन (वेळेआगोदर होण्याचे) होण्याचे.
३. मुम्बई विद्यापिठात कोणालाच एखाद्या विषयाचा एखादया शाखेसाठी असलेला निश्चीत पाठ्यक्रम माहीत नसतो. विद्यार्थी अधांरात तिर मारल्यासारखे कोचिंग क्लासने दिलेल्या अथवा सिनीअर विद्यार्थ्याच्या नोटस् वापरत असतात.
४. विद्यार्थ्यांना परिक्षेची पुर्वतयारी करायला क्वचीतच वेळ मिळतो. आणि केटी परिक्षा व रेग्युलर परिक्षा यांमध्ये खुपच कमी टाईम-गॅप असतो, कधी कधी तो नसतोही.
५. दुसरा एक बकवास विभाग म्हणजे विद्यापिठाचा एक्जाम सेल विभाग. तुमची परिक्षा नापास झाला आहात? आणि तुमचा पेपर पुर्नतपासणी साठी दिला आहात? तर १००% चान्सेस आहेत कि तुमचा पुर्नतपासणी निकाल तुम्हाला केटी परिक्षेनंतरच मिळेल. आजच्या हायटेक जमान्यात देखील विद्यापिठाचे स्वःताचे पोस्टल डिपार्ट्मेंट आहे. येथे मुद्दा असा आहे कि पुर्नतपासणीसाठी विद्यापिठ एका पेपरकरता विद्यार्थ्यांकडुन रु.५०० घेते, या किंमतीमधे विद्यापिठ एक चागंल्या प्रतीची कुरिअर सर्वीस वापरू शकते.
६. विद्यापिठाचे नियम प्रत्येक सत्रासाठी बदलत असतात, त्यामुळे मोर्चा, रॅली अटेन्ड करणे हा सर्वांसाठी कॉमन टाईमपास आहे. (व्हि. जे. टी. आय. चे गेट माझ्या समोरच तोडले गेले होते, त्याची आठवण झाली.)
७. विद्यापिठाच्या प्रश्नपत्रिका या नेहमी चुकांनी भरून असतात. अशावेळेस विद्यार्थ्यांना मार्काची भरपाई हि केवळ त्याने चुक निदर्शनास आणुन दिली, अथवा निटशी ऍडजस्टमेंट करोन ऊत्तर मिळवण्यास यश मिळवले तरच मिळते. तीन तासांत विद्यार्थ्यांने प्रश्नाचीं उत्तरे द्यावयाची असतात का प्रश्नपत्रीका काढणाराच्या चुका शोधायच्या असतात?
८. जरी नियमानुसार विद्यापिठाने परिक्षा उरकल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करावयाचा असला तरी, एकही निकाल वेळेवर लागत नाही..... जवळपास सर्वच निकाल तीन महिंन्यानंतरच लागतात! ईतर विद्यापिठाचे बी. ई. चे विद्यार्थी जॉब मिळवत असतात तेव्हा मुम्बई विद्यापिठाचे विद्यार्थी निकालाची वाट बघत असतात.
१. थोड्या अथवा काहिच सुविधा नसलेल्या कॉलेजनां अभीयांत्रीकी कॉलेज चालवण्याचे लायसेन्स दिले जाते, त्यांच्या कार्यपध्धतीवर कोणाचेच नियंत्रण नसते. ( बहुतेक कॉलेजेस हे राजकारण्यांच्या मालकीचे असतात ज्यांच्यासाठी हे कॉलेज म्हणजे पैशाची झाड असतात ).
२. अभ्यासक्रम हा नियमीतपणे कधीच रिव्यु केला जात नाही. विद्यार्थी त्यांच्या सिनीअर्सना महत्वाचा वाटलेला अभ्यासक्रम वापरत असतात जो कधी कधी अनुपयोगी ठरतो.
३. ऊत्तरपत्रीका हया अनकॉलिफाईड प्रोफेसरकडुन तपासल्या जातात - बर्याचदा त्या विषयाचा त्याला गंधही नसतो! त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रीका याचा संबध तुमच्या मतांनुसार कधीच लागत नाही.
प्रोफेसर:-
हा प्राणी मुख्यत्वे करून नुकतीच ईंजिनीअरीगं ची डिग्री मिळवलेला पण कोणत्याही कंपनीत नोकरी न मिळवू शकलेला असतो. काहीजण त्यामधेच समाधान मिळवून दिवस ढकलतात. जवळपास सर्वच कॉलेजचे प्रध्यापक हे विद्यार्थ्यांना ओझे देण्यात मोठा आंनद मानतात. त्यांच्या हातात २५ गुण असतात. ( जे विद्यार्थांना त्यांच्या टर्मवर्क साठी द्यायचे असतात असे ग्रहित धरले जाते. )आणि विश्वास ठेवा, जर हे २५ गुण प्रध्यापकाकडुन देण्याएवजी घेतले गेले तर एकही विद्यार्थी हु का चू करत नाही जसे काही ते मार्कस त्याच्यासाठी नसतातच मुळी.
पालकः-
पालकांनी त्यांच्या पाल्याच्या परफॉरमन्स बद्दल नेहमीच धीर धरला पाहिजे........... खासकरून मुम्बई विद्यापिठाबाबतीत तरी. विद्यार्थ्याची नेहमीच चुक असते असं नाही त्यामधे घरातुन त्यांच्या दु:खात भर टाकली जाते. पालकांना समजायला हवेय की केटी हा मुम्बई विद्यापिठाच्या अभियात्रींकी विद्यार्थ्यांच्या जिवनातला महत्वाचा भाग आहे,...... जरी त्याची आवड असो वा नसो.
महत्वाची सुचना:-
ईतर विद्यापिठ क्लास देतान फक्त शेवटच्या वर्षाचे गुण ( म्हणजे ७ व ८ वे सत्र ) विचारात घेतात. मुम्बई विश्वविद्यालय सत्र क्र. ५, ६, ७ आणि ८ चे ऍवरेज गुण पकडतात !!! (मला एकिवात आले आहे कि हि पध्धत आता बदलली आहे... कमनशीब आमचे.)हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन विद्यार्थांच्या खराब निकालाबद्दल त्यांना दोष देणे हे चुकिचे ठरते

.........प्रसिक
Related Posts Plugin for WordPress, Blogger...