HTML tutorial  मराठी   HTML tutorial HTML tutorial  HTML tutorial   HTML tutorial  HTML tutorial

सोमवार, ८ जानेवारी, २००७

ती बसमधली

नविन वर्ष आले कि मला एक १९९८ ची घटना आठवते. तेव्हा मी कॉलेज साठी बसने प्रवास करायचो. तर तीची आणि माझी पहिली भेट ३०-१२-१९९८ ला (मला तारखा बरोबर लक्षात राहतात) बसस्टॉपवर झाली. सध्यांकाळी बस नेहमीप्रमाणे लेट झाली होती. ती तीच्या मैत्रीणींसोबत कॉलेजमधुन घरी जायला आली होती. बहुदा हॉस्टेल मधे त्या रहात असाव्यात आणि न्यु-ईअर सेलिब्रेशनसाठी तिच्या घरी जात असाव्यात. बसस्टॉपवर आणि नतंर बसमध्ये तीच्या व माझ्या ग्रुपचे एकमेकांवर कमेन्टस् सारखे चालूच होते. माझा स्टॉप आल्यावर मी माझ्या मित्रांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्या म्हणजे जोरात ओरडून दिल्या, जेणेकरून त्या तीच्या ग्रुपपर्यंत देखिल पोहोचल्या.
नतंर एक आठवड्याने ती पुन्हा बसमध्ये दिसली. या वेळेस एकटीच होती. माझ्या एका मित्राने कन्डक्टर कडून सहजतेने तिच्या स्टॉपचे नाव काढून घेतले.
तीची तिसरी भेट मकर सक्रातींच्या दिवशी झाली. माझ्याकडे तिळगूळ होते. आणि आमचा तिळगुळ समारंभ बसमध्येच सुरू झाला. बसमध्ये इतरांसारखेच तिचेही तोडं गोड केले. इतके होऊन आमच्यामधे संभाषण नावाची कोणतीही गोष्ट नव्हती.
आमची चौथी भेट त्यानतंर आठवड्यानेच झाली. आता मला देखिल समजायला लागले होते कि ही दर शनिवारी तिच्या घरी जाते. त्यादिवशी मी व माझा मित्र तिच्या समोरच्याच सिटवर जाऊन बसलो. तेव्हा ती फिल्मफेअर मॅगेझीन मधे डोके खुपसुन बसली होती. बस सुरू झल्यानतंर पाच मिनीटाने माझ्या मित्राने ते तिच्याकडून मागुन घेतले आणि तीने माझ्याकडचा मिड-डे घेतला. आणखी पाच मिनीटे गेल्यावर ती तीच्या पायाने माझ्या पायानां चाळा करायला लागली. प्रथम मला वाटले चुकून पाय लागला असेल, पण पाच मिनीट गेली, सात गेली, दहा गेली, तरी हिचे कामचालूच होते. बर मी तीच्याकडे बघीतले की ती नजरेला नजरही द्यायला तयार नव्हती. थोड्या वेळाने मी न राहऊन तीला विचारले- काय ग! लाथा कशाला मारतेस.
त्यावेळेस त्या बिचारीने झालेल्या फजितीबद्दल सॉरी बोलून काम निभावले.
मला नतंर वाटले कि तीची अशी फजिती करायला नको होती. परत ती मला बस मध्ये कधीच दिसली नाही.
तिन वर्षे गेल्या नंतर ती पुन्हा एकदा दिसली. माझ्या कझनचे लग्न तिच्या शहरातच होते. तेव्हा ति तिच्या आईसोबत आली होती. तीची आई मला शाळेत मी सहावीला असताना शिकवायला होती. मी त्यानां जुनी ओळख दाखवल्या नतंर त्यानींही जरा गप्पा मारल्या. ती देखिल आमच्या सोबतच होती पण अबोलच. थोड्या वेळाने तीच्या आईचे लक्ष नाही पाहून मी त्या बसमधल्या प्रसंगाबद्दल तीला सॉरी बोललो. तर ती हसायला लागली. म्हणाली- ते आठवल्यावर मलाही देखिल खुप हसायला येते. आणि आम्ही दोघेही खळखळून हासलो. नतंर पुन्हा कधी तीची भेट झाली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...