स्वप्नांना रंग नवे
दैत्य सरो, दु:ख हरो
याहुन मग् काय हवे
सुख, शांती, समृध्दी
अन् इच्छित सर्व मिळो
दीपांच्या तेजाने
तिमिर जळो, नभ उजळो
दिवाळी म्हटलं की सजावट, रांगोळी, फराळ, फटाके यांसोबत आनंदाची पर्वणी म्हणजे दिवाळी अंक. सन १९०९ मधे 'मासिक मनोरंजन' या पहिल्या दिवाळी अंकापासुन सुरू झालेली हि वाचनाची परंपरा यंदा १०१ वर्ष पुर्ण करतेय. या पुढचे पाऊल म्हणजे सन २००० पासुन आंतरजाल वर दिवाळी ऑनलाईन अंक काढण्याची सुरवात 'मायबोली' या संकेतस्थळापासुन चालू झाली. या परंपरेमधे दरवर्षी ईतरही साईट सामिल होत आहेत. या प्रत्येक दिवाळी अकांमधे एकापेक्षा एक दर्जेदार कथा, कविता आणि लेखांचा खजिना वाचायला मिळतो. अशाच काही ऑनलाईन दिवाळी अकांचे सग्रंह करण्यासाठी आणि सर्व अंक एक क्लिक करताच उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न आणि त्या सोबतच सर्वानां दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!


या सग्रंहात ईतर दिवाळी अंक जसे उपलब्ध होतील तेव्हा समाविष्ट केले जातील. वाचकानां अजुन काही अकं सुचवायचे असल्यास Please कमेंट बॉक्स मधे त्याची लिंक द्यावी.

5 comments:
अरे मित्रा मी राइटा क्लिक केल्यवर हा मेसेज कसला येतोय?
मला राइट क्लिक करुन ओपन इन न्यू टॆब करायचे आहे
पण हा मेसेज करू देत नाही आहे
http://weeklysuryakanti.blogspot.com/
sahi
अभि, राईट क्लिक एनेबल केले आहे आणि गौरव तुमचे ब्लोगवर स्वागत आणि तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
Your blog is great
If you like, come back and visit mine: http://b2322858.blogspot.com/
Thank you!!Wang Han Pin
From Taichung,Taiwan
टिप्पणी पोस्ट करा