रात्रीचे २:०५ वाजलेत. चंद्र ढगांच्या चादरीखाली झाकला गेलाय. १४७०साली पिशाच झाल्यापासुन तिने खुप जणांचे रक्त प्राशन केलेय. आतापर्यंत लाखो व्यक्ती तिच्या सौदर्यांला भुलून तिच्या या तहानेला बळी पडलेत. पण तिची तहान कधीच भागत नाही.
काळोख्या रात्री ती एक भक्ष्य हेरून त्याच्या बेडरूम मधे प्रवेश करते. तो एक २४ वर्षाचा तरूण आहे. त्याच्या मानेतील शिरेमधुन वाहणार, सळसळणारं गरम रक्त तिला खुणावतय. तिला पाहताक्षणीच तिच्या डोळ्यांमधे तो हरवत चाललाय. तिला बाहुपाशांमधे घेण्यासाठी तो आतुर झालाय. कोळ्याच्या जाळीप्रमाणे भासणारे तिच्या हातांची बोटे त्याच्या गालावरून फिरतात. तिची तिक्ष्ण नख त्याच्या मानेपर्यंत येवून थांबतात. रक्त पिण्यासाठी आतुर झालेले तिचे चमकणारे दात बघितल्यावर त्याच्या चेहय्रावर भितीची छाया पसरते. त्याचे हात तिला दुर करण्यासाठी धडपडतात पण, तिच्या सामर्थ्यापुढे त्याचा संघर्ष कमी पडतो.
"Relax! शांत हो, फ्क्त थोडसच रक्त, मी तुला मारणार नाही", तिच्या आवाजातल्या नशेने तो शांत होतो.
त्याच्या शर्टाची काही बटने ती सैल करते. तो काहीच हलचाल करत नाही. तिचे तिक्ष्ण सुळ्यांचा मानेवर स्पर्श होताच त्या वेदनांनी फक्त 'अहं' ईतकाच आवाज त्याच्या मुखातून निघतो. त्याचं रक्त ती प्राशन करायला लागते.
अचानकच, ती त्याला स्वतःपासुन दुर ढकलून त्रासलेल्या स्वरात म्हणते, "यक! AB निगेटिव्ह."
1 टिप्पणी:
हाहाहा... काहीच्या काही आहे. पण आवडली पोस्ट
टिप्पणी पोस्ट करा