दुपारचे चार वाजलेत. बाहेर ऊन पडलंय, खरं तर अभाट आलय. आज सुट्टी आहे तरिही मी बोअर होतोय. घरातले सगळे डाराडूर झोपलेत. पण मला आजकाल दुपारी झोप येत नाही. दिवसभर कॉलेजमधे जागून आता दिवसाच्या झोपेची सवयच राहिली नाही.
टि.व्ही. लावतो तर बय्राच ठिकाणी टायटल-के प्रोगाम लागले आहेत. डायलॉग पेक्षा बॅकग्राऊडं म्युझीकचे कर्कश आवाज जास्त आहेत. सर्फ करत अखेर मुव्ही चॅनेल लावतो, आमिताभचा शोले लागलाय. हि फिल्म मला कधीच पुर्णपणे बघायला मिळत नाही. आता पर्यंत डझन वेळा बघीतली असेल पण तुकड्या तुकड्यात. कधी ठाकुरचे हात तोडलेले बघायला मिळतात तर कधी आमिताभ म्हशीवर दिसतो. पण सलग फिल्म बघण्याचे काही माझ्या नशिबात नाही. जाऊदे, आज बघूनच टाकू.
दोनतीन ब्रेक झाल्यानतंर, 'ये दोस्ती हम नही छोडेगें' गाणे टु का थ्री व्हीलरवर चालू होते आणि बाहेर कोणीतरी टु व्हिलरचा गळा साफ करायला लागतो. माझ्या घराशेजारी असे हॉर्न बडवणारे दिवसाला कमीतकमी तीसजण तरी येतात. त्यातले माझ्यासाठी कमीच असतात. हाक मारल्या शिवाय मी देखील जात नाही, ऊगाच दुसय्रासाठी (किवां दुसरीसाठी) असायचा आणि माझा पोपट व्हायचा. थोड्या वेळाने माझ्या नावाच्या हाका सुरू होतात, त्याच्या ओरडण्यात 'शोले' बोबंलणार हे मला देखील समजते. ऊठून बाहेर जातो, माझा मित्र विशाल माझी वाट बघतोय.
“काय करतो आहेस?”
“काही नाही, आणि तु दुपारीच ईतके नटुन थटून कुठे निघालास?” ,विचारत मी पायय्रांवरून खाली ऊतरतो.
“ठिक आहे मागे बस”
“कुठे जायचे आहे का?”
“नतंर सागंतो “
“OK, मी चेन्ज करून येतो.”
“अरे नको, चागंला दिसतो आहेस.”
चांगला दिसतो आहे म्हणतोय तर जवळच कुठेतरी जायचे असेल, कॅरम वैगेरे खेळायला. जाऊया! तसापण घरात बोअरच होत होतो. मी बाईकच्या बॅकसीटवर बसतो.
“अरे, कुठे जातोय आपण?”
“कळेल.”
“आयला! टि.व्ही. बदंच नाही केला, जाऊदे, करेल कोणीतरी.”, मला घराची आठवण येते.
“हॅलो! तुझे घर त्या बाजूला आहे, लक्षात आहे ना?”
“मी घरातुनच तर तुझ्याकडे आलोय.”
आतापर्यंत आम्ही कॉलनीबाहेर जाणारा रस्ता पकडला होता.
“बाहेर जायचे होते, तर मला चेन्ज तरी करून द्यायचे ना.”
“अरे जरा घाईत होतो, आणि तसापण तु चिकणाच दिसतो आहेस.”
वाद घालण्यात काही अर्थ नाही.
“अरे! अनुला भेटायला चाललोय.”
“हो, का? मग मी कशासाठी पाहीजे?” मी विचारतो.
“अरे लगेच जाऊन यायचे आहे, विचार केला तुझीपण आज भेट घालून देतो”
म्हणजे आता कमीतकमी पधंरा किलोमीटरची ड्राईव्ह होणार, बरं झालं वॅलेट नाही आणले, पेट्रोलचा खर्च नको. तसेपण त्याची गर्लफ्रेन्ड आणि मी कशाला खिसा रिकामा करू. साईड-मिरर मधे मी माझा चेहरा पहातो, ठिक दिसायला पाहिजे नाहीतर अनु म्हणायची 'कशा लोकांसोबत राहतो रे तू'. मला त्याच्या प्रेस्टीजची काळजी आहे, करायलाच लागते, afterall मित्र आहे ना!
तसं मी अजून कधी अनु म्हणजे अनिताला भेटलो नाही. काही दिवसांपुर्वी पुर्वी विशालने फोटो दाखवला होता. त्याची क्लासमेट आहे. दहावीपर्यंत मी आणि विशाल एकाच क्लासमधे होतो. दहावी झाल्यानतंर तो कॉमर्सला टाईमपास करतोय, आणि मी पुस्तकी किडा म्हणुन सायन्सला टाईम कसातरी पास करतोय.
पण ह्या गधड्याने, जरा निटसे कपडे घालून दिले असते तर काय बिघडले असते का. अशा कपड्यात मी कधी बाजूच्या मार्केटमधेही जात नाही. आणि आज.... जाऊदे..... त्याची मैत्रीण आहे. त्याचीच ईमेज डाऊन होईल. मला काय त्याचे. मीच माझे समाधान करतो.
थोड्यावेळात आम्ही दोघे कुठल्यातरी रहिवासी एरिआत घिरट्या घालत बसतो. एका बिल्डीगं शेजारी गाडी नेऊन कुठल्याश्या खिडकीकडे ईशारा करून विशाल मला सांगतो, “ती बघ, ती निळी चादर वाळत घातलेय ना, अनु तीथेच राहते.” मी निळी चादर शोधायला लागतो, तोपर्यतं बाईक दुसय्राच बिल्डींग समोर आलेली असते. दुसय्रा फेरीत ती निळी चादर दिसते.
“तीच का?”
“हा तीच.”
त्या निळ्या चादरीमुळे मला माझ्या भावी वहिनीं कुठे राहतात ते समजते. अशाच माझ्या आणखी दोन भावी वहीनींची घरे याने मला पडदे दाखवून, दाखवली होती, नतंर त्याच्यांशी डिवोर्स झाला.थोड्यावेळात तीच्या मोबाईलवर तीन मिस कॉल देऊन होतात. दोन तीचेही येतात. याचा अर्थ ती थोड्या वेळात येणार आहे.
“हा आमचा ठरलेला नेहमीचा सिग्नल आहे”.
“हो का? चागंली गोष्ट आहे. मला तुझ्याकडेच ट्युशन लावायला पाहीजे.”
वा! टेक्नॉलॉजीचा काय वापर चाललाय. मला विशालचे कौतुक वाटते. तो गाडी दुसय्रा एका बाजुच्या गल्ली मधे घेतो, आणि थांबवतो.
“हि आमची नेहमीची भेटण्याची जागा.”
रस्त्याच्या दोन्ही बाजूला बिल्डींग आहेत. अचानक मला आमिरचा 'जो जिता वही सिकदंर' पिक्चर आठवतो. त्या पिक्चरमधे दिपक तिजोरी असाच आपल्या एका मित्राला सोबत घेऊन मोनिका नावाच्या गर्लफ्रेडंला भेटायला आलेला होता. सोबत का, तर एकटाच ऊल्लु दिसेल. दोघेजण दिसले तर दोन उल्लू - दिपक तिजोरीचे मत. नतंर आमिर खान शेणाची बादली घेऊन काय कमाल करतो सागूं.......... बरं झालं शहरात शेण मिळत नाही.
“अरे, ईथे कोणी ओळखीचे आले तर.”, मी विचारतो.
Actually मला माझ्या ओळखीचे ईथं कोणी नाही ना, याची काळजी वाटतेय.
“नाही रे, ईथे कोणी नाही येत, आणि आले तर काय, सांगायचे गप्पा मारतोय.”मला विशालच्या धिटपणाचेही कौतुक वाटते.
“अरे, ती बघ, अनू ईकडे येतेय.”
तो १०० फुटावर असलेल्या एका मुलीकडे ईशारा करतो. ती जवळ येते. तीने फॉर्मल पजांबी ड्रेस घातलाय. काकूबाई स्टाईलची वाटतेय. हातात एक १x१.२ फुट आकाराची प्लॅस्टीकची पिशवी आहे. त्यात नक्किच तीने गिफ्ट आणलयं. WoW! Lucky guy……. VISHAL!
“हाय!” ती शक्य तेवढ्या गोड आवाजात म्हणते. मी देखिल ओठ ताणुन शक्य तसे Smyle आणत "हाय!" म्हणतो."अगं कधीपासून मिस कॉल देतोय, पण तुझा फोनच लागत नव्हता, रेन्ज मधे नव्हता का?" विशाल विचारतो.
गधड्याने माझ्या समोर मोजून तीन मिस कॉल दिलेत आणि म्हणे कधीपासून!
“नाही तर,” ती वाद घालत नाही, “अरे, मम्मी जागी होती ना, म्हणुन ऊशीर झाला. बरं घरी आई कशा आहेत?”
वा! वहिनीनां काय काळजी आहे सासुबाईचीं. विशाल यार, ग्रेट चॉईस.
“ठिक आहे.”
“बरं हो! ओळख करून देतो, हा माझा मित्र प्रशातं, आणि प्रशातं हि अनिता.”
“हॅलो”, मघाशीच आम्ही ‘हाय’ केले होते तरी परत हॅलो करतो.
“हा माझ्या शाळेमधला जुना मित्र, कधीपासुन म्हणत होता तुला भेटायचे आहे, म्हणुन आज घेऊनच आलो.”
मला भेटायचे होते?, पण मी याला कधी सांगितले, मी आठवण्याचा प्रयत्न करतो.
“तु ईथे जवळच राहतोस का?”, मला आठवणींच्या जगातून ती बाहेर काढते. तीचा प्रश्न माझ्या कपड्याशीं संबधीत आहे असे मला उगाचच वाटते, आणि मी उगाचच विशाल ला शिव्या देतो.....मनातल्या मनात हो!
“नाही ग!, माझ्या शेजारी राहतो”, माझा मित्र विशाल माझी मदत करतो.
‘तरी पण असाच ईकडे आला....’ मी मनातल्या मनात.
“हा!” मी देखिल म्हणतो.
ती तीच्या सोबत आणलेली पिशवी पुढे करते.
“हे तुझ्या साठी”, ती म्हणते
“कशासाठी आणलसं? उगाचच!”, विशाल पिशवी घेत म्हणतो.
“काही नाही, काल बाजारात गेले होते, आवडले म्हणुन तुझ्यासाठी घेऊन आले.”
“काय आहे?”, तो पिशवी उघडायला बघतो.
ती हळूच त्याच्या हातावर हलकेसे मारते.
“आता नको ऊघडू, नतंर बघ.”, ती लाडात येऊन म्हणते
“आता का नको?”
“सांगितले ना, घरी जाऊन बघ.”
मला ही स्टाईल जाम आवडते, गिफ्ट हातात आहे आणि ते काय आहे या एक्साईटमेन्टमधे वेळ घालवायचा, How Romantic ना? ‘बाळ विशाल! ते गिफ्ट आयुष्यात कधीच उघडु नकोस!’ मला आवर्जून सांगावेसे वाटते पण तो मोह मी आवरता घेतो. त्या पिशवीच्या आकारमानावरून मी १०१% सांगू शकतो त्यामधे एक फोटोफ्रेम आहे, कारण अशा फ्रेमस् विशालकडे अजुन दोन आहेत. माझ्या आगोदरच्या भावी वहिनीनीं दिलेल्या. ह्या पोरिनां अजुन काहीच भेटत नाही का द्यायला. जाऊदे, तीनं ते तरी आणलयं नाहीतर! ह्याने काय आणले, मला दाखवायला घेऊन आला, तो पण असा.
“अरे प्रशातं, काहीतरी बोलना”, अचानक विशालला माझी आठवण येते.
“नाही चालू द्या तुमचे”, मी ‘काय बोलू’ या विचारात पडतो.
“हा प्रशातं ना, मुलीशीं कधी जास्त बोलत नाही, सुरवातीपासुनच मुलीशीं त्याचे कमी रिलेशन आहेत.”
हा माझी तारिफ करतोय का.... मला समजायला मार्ग नाही. ती देखिल निर्वीकार चेहय्राने त्याचे एकत राहते. यानां काहीतरी प्रायव्हेट बोलायचे असेल म्हणुन मी बाईकवरून ऊठतो. मला सोबत घेऊन आलाय म्हणुन काय झाले, त्यांचा विचार करायलाच हवा. मित्र आहे मी त्याचा.
“कुठे चाललास”, विशाल विचारतो.
“अरे, कुठे नाही, जरा फोन करून येतो.”
मी त्याच्यांपासून २० ते २५ फुटांवर उभा राहतो, जेणे करून त्याचें बोलणे मला एकायला येणार नाही. एक बरं झालं, मोबाईल खिशातच आहे. तो नाही घरी ठेऊन आलो. नाहीतर ईथंपण बोअर झालो असतो.
मोबाईलची कुठलीपण बटणे दाबत रहा, आणि समोरच्याला दाखवा तुम्ही कित्ती कित्ती बीझी आहत. जाम मजा येते. मी उगाचच रॉन्ग नबंर डायल करतो, वर समोरच्याने फोन ऊचलला नाही म्हणुन चेहय्रावर राग आल्याचे दाखवत राहतो. कधीतरी त्या Lovebirds कडे पहातो, तर कधी आजुबाजूच्या बिल्डीगंमधून वास काढतोय का बघतो. कोणी दिसत नाही. मधेच विशाल मला हाताच्याच ईशाय्राने ‘काय?’ असे विचारतो.
मी देखिल ‘CARRY ON!’ चा ईशारा करतो, तसं करण्याशिवाय गत्यंतर नसते. येणारे जाणारे लोक त्याच्यांकडे बघत असतात, अणि ते दोघे लक्ष नाही असे दाखवतात. काही जण माझ्याकडेही पाहतात. कदाचीत त्यानांदेखिल माहीत असावे मी साईड-चा-हिरो आहे, आणि आता बोअर होत आहे.
माझा मोबाईल अजून कानालाच आहे, रॉन्ग नबंर लाऊन मी बोलत बसतो. पलिकडची मुलगी गोड आवाजात माझ्याशी गप्पा मारत रहाते. कमीत कमी आठ वेळा तीन लॅग्वेज मधे ‘तुम्ही डायल केलेला नंबर अस्तीत्वात नाही’ असं समजावते. तरीदेखिल मी पुन्हा पुन्हा तीलाच कॉल करतो. अशा वेळेस मला ती नेहमी Company देते.
शेवटी विशाल ‘जायचे आहे’ असा ईशारा करून मला बोलवतो. बाईकवर बसताना तो गिफ्टची पिशवी माझ्याकडे देतो.
“अरे वा! गिफ्ट, माझ्यासाठी? थॅक्स हं अनिता!”, मी म्हणतो.
ती हसायला लागते. मी चागंला जोक केलाय, याचा मला देखिल साक्षात्कार होतो.“नेक्स्ट टाईम तुझ्यासाठी आणेन” ती हसत म्हणते.
“ SURE? बघ हा! आणि हो,…… मला डेअरी मिल्क आवडते”, माझी आवड तीला सांगतो.
विशालच्या चेहय्रावरून त्याला माझ्या दातांची काळजी आहे असं जाणवायला लागते, पण तो देखिल हसायला लागतो. “ठिक आहे निघू आता?” विशाल विचारतो.
“OK SEE YOU, BYE, नतंर फोन कर”, ती म्हणते.
“तु पण, आता लवकर घरी जा”, मी तीला हक्काने सांगतो. Why not, I care about her, afterall she is my ‘VAHINI’.
बाईकवरून विशाल मला माझ्या घरी सोडतो.
“काय रे, बाहेर जाताना टि. व्ही. बदं करून जायला काय होतेय?” घरात शिरताच आई विचारते.
“अगं विसरलो, विशालकडे गेलो होतो”
मी परत टिव्हीचा रिमोट हातात घेतो. ठाकुर गब्बरच्या हातावर पाय देऊन 'ये हात मुझे दे गब्बर' म्हणतोय. गब्बरने खुप सारे चॉकलेट्स् खाल्ले असतील आणि आता त्याला विकोवज्रदंतीची खुप गरज आहे असं वाटतं. थोड्याच वेळात विशालचा फोन येतो.
“अरे! माझं गिफ्ट कुठे आहे.”
“आहे रे माझ्याकडे, बघु का काय आहे?”, मी विचारतो.
“नको, राहु दे”, ईतके बोलून तो फोन ठेऊन देतो.
+++++
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा