एक जानेवारीची सकाळ निसर्गाच्या सानिध्यात, फुला-फुलांमभून मध गोळा करत भिरभिरणाय्रा फुलपाखरांच्या सहवासात गेली तर त्यापेक्षा नवीन वर्षाची सुंदर सुरवात आणखी ती काय होणार. ड्युटीच्या तासांमुळे थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनचे बारा वाजलेच होते, पण त्यामुळे सकाळी मात्र साडेपाच वाजताच जाग आली. पनवेलवरून ठाणे-ओवळा ईथे पोहोचायला जवळपास दिड तास लागतो, ट्रॅफिक मधे फसल्यावर किती वेळ लागेल याचं कॅलक्युलेशन करून घरातुन जरा लवकरच निघालो. आदल्या दिवशी मि. राजेंद्र ओवळेकरांकडे बोलणे झालेच होते. सूर्यकिरण आल्याशिवाय फुलपाखरे येत नाहीत त्यामुळे त्यांनी सकाळी ९:३० पर्यंत पोहचायला सांगितले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बरोब्बर साडे-आठ वाजता म्हणजे एक तास आगोदर त्यांच्या बागेत हजर झालो
आम्ही पोहोचण्यापूर्वी आणखीही काही हौशी निसर्गप्रेमी स्वेटर घालून आलेले होते. त्यामधे एक ३-४ वर्षाची फुलपाखरांच्या डिझाईनचे शुज घातलेली चिमुरडी देखील होती. सोबतीला हा BLACK DRONGO देखिल सकाळची न्याहरी करायला आला होता.
प्रचि. क्र.१-
मि. राजेंद्रनीं त्या चिमुरडीला देखिल समजेल अशा शब्दांत फुलपाखरांच्या जीवनक्रमातील अंडी, आळ्या(सुरवंट), कोश (प्युपा) आणि सर्वात शेवटी फुलपाखरू यांची माहिती देण्यास सुरवात केली.
प्रचि. क्र.२- लिंबाच्या पानावरील मोहरीच्या दाण्याएवढा आकार असलेली ही फुलपाखरांची अंडी.
फुलपाखराची मादी अंडी देण्यासाठी लिंब, कडिपत्ता यांसारख्या झाडांची निवड करते, फुलपाखरानां अन्न मिळण्यासाठी ओवळेकर वाडीमधे विवीध प्रकारची १५० पेक्षा जास्त जातींची झाडे लावली आहेत.
प्रचि. क्र.३- त्यानंतर लिंबाच्या पानावरची हिरव्यारंगातली कॅटरपिलर. नेहमीप्रमाणे भाजीपाल्यातली किड बघितल्यावर ई-ई~ सारखे निघणारे शब्द कोणाच्याही तोंडातून आले नाहीत.
प्रचि. क्र.४- फुलपाखरू उडून गेल्यावर मागे राहीलेला कोष
प्रचि. क्र.५-आणखी एक कॅटरपिलर
यानंतर आमचा मोर्चा फुलझाडांकडे वळला आणि नवीन वर्षातली पहिली सकाळ रंगेबिरंगी होऊन गेली.
कॉमन मॉर्मन- हे फुलपाखरू क्रिम्प्सन रोझची मिमीक्री करण्यात पटाईत आहे.
प्रचि. क्र.६- कॉमन सेलर- फोटो काढताना याने अजिबात त्रास दिला नाही, शहाण्या मुलासारखा कॅमेरासमोर बसला होता.
प्रचि. क्र.७- कॉमन जॅझबेल- दिसायला सुंदर आणि मध पिताना अतिशय तल्लीन होऊन मध पितो, फोटोग्राफरच्या भाषेत सांगायचे तर एकदम फोटोजेनीक
प्रचि. क्र.८- क्रिम्प्सन रोझ
प्रचि. क्र.९-कमांडर:याचे ऊडणे म्हणजे एखाद्या ग्लाईडर प्रमाणे होते, फोटो काढताना दुर गेला कि लवकर परत येतच नाही
प्रचि. क्र.१०- ब्ल्यु टायगर
प्रचि. क्र.११- साईक- जमिनीपासुन जेमतेम एक फुट उंचीवर हे फुलपाखरू फडफडते आणि स्थीर झाल्यावर एखाद्या फुलाच्या पाकळीसारखे भासते
प्रचि. क्र.१२- कॉमन ग्रास यलो- नावाप्रमाणेच कॉमन, सर्वत्र आढळणारे
प्रचि. क्र.१३- जोडी बॅरोन
प्रचि. क्र.१४- टेल-जे: फोटोग्राफीसाठी या सायबांनी सर्वात जास्त मेहनत करून घेतली, फुलांवर देखिल नुसतं भिरभीर करताना मध कसा पित असेल त्याचं त्यालाच माहीत.
प्रचि. क्र.१५- ऑरेंज-टिप- या ट्रीपमधे दिसलेला सर्वात सुंदर फुलपाखरू, प्रथम दर्शनीच सर्वांचे मन मोहून घेतले, फोटो काढण्यासाठी एका जागेवर थांबतच नाही.
प्रचि. क्र.१६- डॅम्सेफ्लाई म्हणजेच सुई, सुकलेल्या पालापाचोळ्यात हिला शोधणे म्हणजे अक्षरशः गवतात सुई शोधण्यासारखे होते.
प्रचि. क्र.१७- क्रिम्सन रोझ
प्रचि. क्र.१८- कॉमन वॅडंरर: दोन चित्रांमधील फरक ओळखा स्पर्धेसाठी याला 'टायगर ब्ल्यु' सोबत उभा केला पाहिजे
प्रचि. क्र.१९- कॉमन बुश बटरफ्लाय
प्रचि. क्र.२०- कॉमन बॅरोन बटरफ्लाय
या नंतर दिसलेली फुलपाखरांची नावे समजू शकली नाहीत, मि. राजेंद्र यांच्या सभोवताली क्राउड असल्याने आम्ही स्वःतच दुरवर भटकत होतो
प्रचि. क्र.२१-
प्रचि. क्र.२२-
प्रचि. क्र.२३-
प्रचि. क्र.२४-
प्रचि. क्र.२५-
प्रचि. क्र.२६-
प्रचि. क्र.२७-
प्रचि. क्र.२८-
प्रचि. क्र.२९-
सकाळी स्वागताला हजर असणाय्रा या जोडीचा फोटोग्राफ घेतल्यावरच आम्ही फुलपाखरांच्या बागेचा निरोप घेतला

६ टिप्पण्या:
आपल्या अनुदिनीवरील ही छायाचित्रमाला बेहद्द आवडली. आपली परवानगी गृहित धरून आपल्या अनुदिनीची लिंक माझ्या निवडक मित्रांना पाठवत आहे.
मंगेश नाबर.
Wow mastach. Kiti vegvegalya prakarachi chhan chhan fulpakhare ahet...
सुंदरच आहेत हे फोटो!
ते शिंक्यासारखे आहे ते काय आहे?
मस्त मस्त मस्त....कोणे एके काळी Borviali National पार्क मध्ये केलेल्या ट्रेलची आठवण झाली....नाव लिहिल्यामुळे पुन्हा एकदा ती रिविजन पण झाली...मस्त...
अपर्णा, ऊर्जस्वल, इंद्रधनू, mannab प्रतिसादांबद्दल थॅक्स. ऊर्जस्वल त्या कप्स मधे फुलपाखरांसाठी फळांचे तुकडे ठेवलेले आहेत :)
Nice collection. Ovalekar wadi is a good place to visit for butterflies !
टिप्पणी पोस्ट करा