HTML tutorial  मराठी   HTML tutorial HTML tutorial  HTML tutorial   HTML tutorial  HTML tutorial

सोमवार, ८ जानेवारी, २००७

ती बसमधली

नविन वर्ष आले कि मला एक १९९८ ची घटना आठवते. तेव्हा मी कॉलेज साठी बसने प्रवास करायचो. तर तीची आणि माझी पहिली भेट ३०-१२-१९९८ ला (मला तारखा बरोबर लक्षात राहतात) बसस्टॉपवर झाली. सध्यांकाळी बस नेहमीप्रमाणे लेट झाली होती. ती तीच्या मैत्रीणींसोबत कॉलेजमधुन घरी जायला आली होती. बहुदा हॉस्टेल मधे त्या रहात असाव्यात आणि न्यु-ईअर सेलिब्रेशनसाठी तिच्या घरी जात असाव्यात. बसस्टॉपवर आणि नतंर बसमध्ये तीच्या व माझ्या ग्रुपचे एकमेकांवर कमेन्टस् सारखे चालूच होते. माझा स्टॉप आल्यावर मी माझ्या मित्रांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्या म्हणजे जोरात ओरडून दिल्या, जेणेकरून त्या तीच्या ग्रुपपर्यंत देखिल पोहोचल्या.
नतंर एक आठवड्याने ती पुन्हा बसमध्ये दिसली. या वेळेस एकटीच होती. माझ्या एका मित्राने कन्डक्टर कडून सहजतेने तिच्या स्टॉपचे नाव काढून घेतले.
तीची तिसरी भेट मकर सक्रातींच्या दिवशी झाली. माझ्याकडे तिळगूळ होते. आणि आमचा तिळगुळ समारंभ बसमध्येच सुरू झाला. बसमध्ये इतरांसारखेच तिचेही तोडं गोड केले. इतके होऊन आमच्यामधे संभाषण नावाची कोणतीही गोष्ट नव्हती.
आमची चौथी भेट त्यानतंर आठवड्यानेच झाली. आता मला देखिल समजायला लागले होते कि ही दर शनिवारी तिच्या घरी जाते. त्यादिवशी मी व माझा मित्र तिच्या समोरच्याच सिटवर जाऊन बसलो. तेव्हा ती फिल्मफेअर मॅगेझीन मधे डोके खुपसुन बसली होती. बस सुरू झल्यानतंर पाच मिनीटाने माझ्या मित्राने ते तिच्याकडून मागुन घेतले आणि तीने माझ्याकडचा मिड-डे घेतला. आणखी पाच मिनीटे गेल्यावर ती तीच्या पायाने माझ्या पायानां चाळा करायला लागली. प्रथम मला वाटले चुकून पाय लागला असेल, पण पाच मिनीट गेली, सात गेली, दहा गेली, तरी हिचे कामचालूच होते. बर मी तीच्याकडे बघीतले की ती नजरेला नजरही द्यायला तयार नव्हती. थोड्या वेळाने मी न राहऊन तीला विचारले- काय ग! लाथा कशाला मारतेस.
त्यावेळेस त्या बिचारीने झालेल्या फजितीबद्दल सॉरी बोलून काम निभावले.
मला नतंर वाटले कि तीची अशी फजिती करायला नको होती. परत ती मला बस मध्ये कधीच दिसली नाही.
तिन वर्षे गेल्या नंतर ती पुन्हा एकदा दिसली. माझ्या कझनचे लग्न तिच्या शहरातच होते. तेव्हा ति तिच्या आईसोबत आली होती. तीची आई मला शाळेत मी सहावीला असताना शिकवायला होती. मी त्यानां जुनी ओळख दाखवल्या नतंर त्यानींही जरा गप्पा मारल्या. ती देखिल आमच्या सोबतच होती पण अबोलच. थोड्या वेळाने तीच्या आईचे लक्ष नाही पाहून मी त्या बसमधल्या प्रसंगाबद्दल तीला सॉरी बोललो. तर ती हसायला लागली. म्हणाली- ते आठवल्यावर मलाही देखिल खुप हसायला येते. आणि आम्ही दोघेही खळखळून हासलो. नतंर पुन्हा कधी तीची भेट झाली नाही.

मंगळवार, २ जानेवारी, २००७

मी आणि तू

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतो

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देतो की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल

.....प्रसिक

मुम्बई विद्यापिठ आणि ईंजिनीअरीगंचे विद्यार्थी

मुम्बई विद्यापिठ आणि ईंजिनीअरीगंचे विद्यार्थीमुम्बई विद्यापिठ हे १५० वे वर्ष साजरे करते आहे. त्या निमीत्ताने लिहलेला हा लेख मी मुम्बई विद्यापिठाला व तेथे शिकणाय्रा असंख्य अभियात्रिंकीच्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो.
जर तुम्हाला वाटत असेल कि ईंजिनीअरीगं चे विद्यार्थी साहीत्यांमधे कमकूवत असतील तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. पुढील शायरी वाचा, तुमचा हा गैरसमज नक्कीच दुर होईल...............
वो बाप हि क्या जिसकी बेटी नही
वो ईंजिनीअर हि क्या जिसकी केटी नही.
एक बार में पास हुआ तो क्या किया,
बिना फेल हुये जिया तो क्या जिया
ईंजिनीअर कॉलेजमें ईतने साल मरते है,
कभी कभी तो बाप और बेटे एक ही क्लास में पढते है.

वरील ओळी काही जणांना अजब वाटतील, पण ह्या आणि अशा कित्येक ओळी मुम्बई विश्वविद्यालयाच्या ईंजिनीअरिंग विद्यार्थ्यांच्या जिवनात काही सुखाचे क्षण निर्माण करतात. प्रथम वर्षाच्या दुसय्रा सेमिस्टरला नापास होण्याची प्रथा यावर्षी देखिल ६५% हुन आधीक विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. येथे मी विद्यार्थ्यांकडे भेदभाव न करता सुचीत करू ईच्छीतो कि ईंजिनीअरीगं चे विद्यार्थी हे बारावीला सरासरी ८०% गुण ( अपवाद फक्त बडे बाप के बेटे जे प्रवेश बाप की मेहनत की कमाई वर घेतात व नापास होऊन कॉलेजमधून बाहेर पडतात.) मिळवून प्रवेश मिळवतात. तरिही पास होणं अभावानेच आढळते. मग हे ईंजिनीअरीगं आहे तरी काय. विद्यार्थी नापास का होतात? विद्यार्थी आभ्यास करत नाहीत हा मुद्दा मान्य न करण्यासारखा आहे, कारण जो विद्यार्थी बारवीला ८०% ते ९०% मार्कस् काढतो त्याला अभ्यास कधी व कसा करावा हे सांगण्याची गरज मला तरी नाही वाटत. मग दोष कोणाला द्यावा? मुम्बई विश्वविद्यालयाच्या माजी ईंजिनीअरिंग विद्यार्थी असल्या कारणाने मला हा लेख लिहावसा वाटतो.

विश्वविद्यालयः
१. विद्यार्थ्यांचे वर्ष हे जुन महीन्यात सुरू व्हावे हि अपेक्षा असते, पण १५ ऑगस्टच्या आगोदर कॉलेजकडे कुत्रं देखिल फिरकत नाही. कॉलेज दरवर्षी १ ते २ महीने ऊशीरा सुरू होते, कारण लेट ऍडमिशनस्, कोर्टाची स्थगिती, मेडीकल एन्ट्रनस् आणि असेच बरेच काही. ऑगस्टमधे कॉलेज सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांकडून डिसेबंरच्या पहील्या आठवड्यात पहील्या सत्रासाठी परिक्षेला बसण्याची अपेक्षा केली जाते. फक्त दोन महीन्यांनतंर परिक्षेला बसण्यापुर्वी विद्यार्थ्यांकडून पुढील बाबींची पुर्तता परिक्षेपुर्वी करण्यास सांगण्यात येते.
अ. कमीतकमी पाच विषयाच्या प्रात्यक्षीक व त्याचे जरनल (त्या विषयाच्या टिचर-ईन-चार्ज कडुन सर्टीफाय केलेल्या असाव्यात) पुर्ण लिहून सबमीट करायचे असते. या सोहळ्याला सबमिशन असे नाव दिले गेले आहे. खरोखरच ते एखाद्या मिशन पेक्षा कमी नसते.
ब. प्रत्येक विषयाच्या कमीत-कमी तीन असायनमेन्टस् त्या सुध्धा दिलेल्या वेळेत पुर्ण करून. असायनमेन्टस् म्हणजे अश्या प्रश्नांचा संच जो विद्यार्थ्यांकडून अ-४ च्या कागदावर ऊत्तर लिहून पुर्ण केला जातो. प्रश्नाची संख्या हि प्रत्येक शिक्षकाच्या स्वभावावर अवलंबून असते, पण शक्यतो ती जास्तच ठेवली जाते. वर्गातले काही किताबी किडेच ते सोडवतात आणि ईतर् छपरी पोरे त्याची नक्कल उतरवतात. त्यामुळे ईंजिनीअरीगं चे विद्यार्थी जर तुम्हाला ट्रेनमधे, बेस्टचा बसमधे अथवा रेस्टारंट मधे काही लिहताना दिसले तर आश्चर्य करण्याचे काहिही कारण नाही. तुम्ही कधी ७:२७ च्या अधेंरी-बेलापुर लोकलने कधी प्रवास केला आहे का? जर नसेल तर एकदा करूनच् पहा. जे भेटेल त्याचा आधार घेऊन ईंजिनीअरीगं चे विद्यार्थी त्यांचे असायनमेन्टस् खरडताना दिसतील.
क. त्यानंतर कमांक लागतो तो म्हणजे क्रॅश कोर्स मालिका, काही स्टुडन्टस कोचींग क्लासला जातात त्यांना पुर्वतयारी करायला लागते ( सर्वच गोष्टींची ), कारण बहूतेक कॉलेज त्यांच्या अभ्यासक्रमात खुपच मागे असतात.२. परिक्षेचे वेळापत्रक कधीच नियमीत नसते. हे कदाचीत एकण्यास नवीन नसावे, परिक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आगोदर देखिल पुढे ढकलल्या जातात! सर्वात वाईट द्रुश्य म्हणजे परिक्षा प्रिपोन (वेळेआगोदर होण्याचे) होण्याचे.
३. मुम्बई विद्यापिठात कोणालाच एखाद्या विषयाचा एखादया शाखेसाठी असलेला निश्चीत पाठ्यक्रम माहीत नसतो. विद्यार्थी अधांरात तिर मारल्यासारखे कोचिंग क्लासने दिलेल्या अथवा सिनीअर विद्यार्थ्याच्या नोटस् वापरत असतात.
४. विद्यार्थ्यांना परिक्षेची पुर्वतयारी करायला क्वचीतच वेळ मिळतो. आणि केटी परिक्षा व रेग्युलर परिक्षा यांमध्ये खुपच कमी टाईम-गॅप असतो, कधी कधी तो नसतोही.
५. दुसरा एक बकवास विभाग म्हणजे विद्यापिठाचा एक्जाम सेल विभाग. तुमची परिक्षा नापास झाला आहात? आणि तुमचा पेपर पुर्नतपासणी साठी दिला आहात? तर १००% चान्सेस आहेत कि तुमचा पुर्नतपासणी निकाल तुम्हाला केटी परिक्षेनंतरच मिळेल. आजच्या हायटेक जमान्यात देखील विद्यापिठाचे स्वःताचे पोस्टल डिपार्ट्मेंट आहे. येथे मुद्दा असा आहे कि पुर्नतपासणीसाठी विद्यापिठ एका पेपरकरता विद्यार्थ्यांकडुन रु.५०० घेते, या किंमतीमधे विद्यापिठ एक चागंल्या प्रतीची कुरिअर सर्वीस वापरू शकते.
६. विद्यापिठाचे नियम प्रत्येक सत्रासाठी बदलत असतात, त्यामुळे मोर्चा, रॅली अटेन्ड करणे हा सर्वांसाठी कॉमन टाईमपास आहे. (व्हि. जे. टी. आय. चे गेट माझ्या समोरच तोडले गेले होते, त्याची आठवण झाली.)
७. विद्यापिठाच्या प्रश्नपत्रिका या नेहमी चुकांनी भरून असतात. अशावेळेस विद्यार्थ्यांना मार्काची भरपाई हि केवळ त्याने चुक निदर्शनास आणुन दिली, अथवा निटशी ऍडजस्टमेंट करोन ऊत्तर मिळवण्यास यश मिळवले तरच मिळते. तीन तासांत विद्यार्थ्यांने प्रश्नाचीं उत्तरे द्यावयाची असतात का प्रश्नपत्रीका काढणाराच्या चुका शोधायच्या असतात?
८. जरी नियमानुसार विद्यापिठाने परिक्षा उरकल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करावयाचा असला तरी, एकही निकाल वेळेवर लागत नाही..... जवळपास सर्वच निकाल तीन महिंन्यानंतरच लागतात! ईतर विद्यापिठाचे बी. ई. चे विद्यार्थी जॉब मिळवत असतात तेव्हा मुम्बई विद्यापिठाचे विद्यार्थी निकालाची वाट बघत असतात.
१. थोड्या अथवा काहिच सुविधा नसलेल्या कॉलेजनां अभीयांत्रीकी कॉलेज चालवण्याचे लायसेन्स दिले जाते, त्यांच्या कार्यपध्धतीवर कोणाचेच नियंत्रण नसते. ( बहुतेक कॉलेजेस हे राजकारण्यांच्या मालकीचे असतात ज्यांच्यासाठी हे कॉलेज म्हणजे पैशाची झाड असतात ).
२. अभ्यासक्रम हा नियमीतपणे कधीच रिव्यु केला जात नाही. विद्यार्थी त्यांच्या सिनीअर्सना महत्वाचा वाटलेला अभ्यासक्रम वापरत असतात जो कधी कधी अनुपयोगी ठरतो.
३. ऊत्तरपत्रीका हया अनकॉलिफाईड प्रोफेसरकडुन तपासल्या जातात - बर्याचदा त्या विषयाचा त्याला गंधही नसतो! त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रीका याचा संबध तुमच्या मतांनुसार कधीच लागत नाही.
प्रोफेसर:-
हा प्राणी मुख्यत्वे करून नुकतीच ईंजिनीअरीगं ची डिग्री मिळवलेला पण कोणत्याही कंपनीत नोकरी न मिळवू शकलेला असतो. काहीजण त्यामधेच समाधान मिळवून दिवस ढकलतात. जवळपास सर्वच कॉलेजचे प्रध्यापक हे विद्यार्थ्यांना ओझे देण्यात मोठा आंनद मानतात. त्यांच्या हातात २५ गुण असतात. ( जे विद्यार्थांना त्यांच्या टर्मवर्क साठी द्यायचे असतात असे ग्रहित धरले जाते. )आणि विश्वास ठेवा, जर हे २५ गुण प्रध्यापकाकडुन देण्याएवजी घेतले गेले तर एकही विद्यार्थी हु का चू करत नाही जसे काही ते मार्कस त्याच्यासाठी नसतातच मुळी.
पालकः-
पालकांनी त्यांच्या पाल्याच्या परफॉरमन्स बद्दल नेहमीच धीर धरला पाहिजे........... खासकरून मुम्बई विद्यापिठाबाबतीत तरी. विद्यार्थ्याची नेहमीच चुक असते असं नाही त्यामधे घरातुन त्यांच्या दु:खात भर टाकली जाते. पालकांना समजायला हवेय की केटी हा मुम्बई विद्यापिठाच्या अभियात्रींकी विद्यार्थ्यांच्या जिवनातला महत्वाचा भाग आहे,...... जरी त्याची आवड असो वा नसो.
महत्वाची सुचना:-
ईतर विद्यापिठ क्लास देतान फक्त शेवटच्या वर्षाचे गुण ( म्हणजे ७ व ८ वे सत्र ) विचारात घेतात. मुम्बई विश्वविद्यालय सत्र क्र. ५, ६, ७ आणि ८ चे ऍवरेज गुण पकडतात !!! (मला एकिवात आले आहे कि हि पध्धत आता बदलली आहे... कमनशीब आमचे.)हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन विद्यार्थांच्या खराब निकालाबद्दल त्यांना दोष देणे हे चुकिचे ठरते

.........प्रसिक
Related Posts Plugin for WordPress, Blogger...