HTML tutorial  मराठी   HTML tutorial HTML tutorial  HTML tutorial   HTML tutorial  HTML tutorial

सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

थ्रोट कट रेझर









     हातामधे अलगद उचलेल प्रियाच शरिर वजनाने हलक होत. नऊ वर्षापुर्वी महाबळेश्वरला त्याने जेव्हा तिला पहिल्यांदा हातात उचलून घेतले होते तेव्हापासून तिच्या वजनात जास्त फरक नव्हता पडला.
     रवीने काळजीपुर्वक तिला बेडवर ठेवलं, त्याच्या अपेक्षेनुसार तिची काहिच हलचाल नव्हती. घाई करत तो रूम मधून बाहेर पडला. प्लॅनिंगपेक्षा त्याला आगोदरच ऊशीर झाला होता.

     हातामधे पुन्हा एकदा रेझर घेतला, त्याच्या चमकदार शार्प ब्लेडवर लाल रक्त लागल होतं. थ्रोट-कट-रेझर का म्हणतात हे त्याच्या पात्यावर गोठणाय्रा रक्ताला  पाहूनच कल्पना येत होती.

     तेव्हड्यात दारावरची बेल वाजली. कानाला नकोसा वाटणारा आवाज. रागानेच त्याने रक्ताचे डाग पुसून दरवाजकडे नजर टाकली की या अनपेक्षीत वेळेस कोण आला असेल.

"येस!" रवीच्या आवाजात रागिटपणा होता, दार सुध्दा त्याने फक्त चेहरा दिसण्यापुरती फट राहील ईतकाच उघडला.

"हाय रवी,-- मे आय कम ईन?" त्या तरूणाच्या बोलण्यात एक साधेपणा होता. " i wanna talk with you, Its Important."

"तु ईथं....काय...." पण रवी चे बोलणं संपण्या आगोदरच मनोजने दरवाजा अजून उघडला आणि त्याच्या हातातुन रेझर हिसकावून घेतल.

"What the hell you ----"

"रवी, हे बघ, माझं ऐक, उगाच काही वेडेपणा करू नकोस, तिची तेवढी लायकी नाही आहे!"

"what are you talking about?" कपाळावर आठ्या आणत रवीने विचारले

     आजुबाजूला बघत मनोज म्हणाला, "आपण आत बोलू, ईथं नको"

     मनोजचे शब्द ऐकून एका क्षणासाठी रवीच्या डोळ्यासमोर आंधारी पसरली होती. बाजूला होवून स्वत:ला सावरत त्याने मनोजला आत येवू  दिले.  

     दोघानींही एकमेकांकडे नजर टाकली. रवीला पुढे काय बोलायचे कळत नव्हते. रेझरकडे पहात मनोजने विचारले, "प्रिया कुठे आहे? ईज शी ऑल राईट?"

     रवीला मनोजच्या डोळ्यात कसलीतरी भिती दिसत होती पण तरिही तो गप्प होता.

"I think, माझ्याबद्दल तिने तुला सांगितलच असेल. ती नेहमी तुला कळवण्याची धमकी द्यायची. .......I know  हे ऐकून की तुला माझा राग येईल but I can understand."

     रवी पलटून काहितरी बोलेल असं मनोजला वाटलं. पण तसं काहिच झालं नाही. "हे बघ I am sorry! जे काही झालं ते चुकीचं होतं, totaly wrong.  तिने जॉब शोधायला मला मदत केली तरी मी असं नाही करायला हवं होतं. पण प्रिया असताना माझ्याकडून या सगळ्या गोष्टी नकळत घडत गेल्या, ........"

     रवीने मनोजकडे प्रश्नांर्थक चेहय्राने बघितल.

"प्रिया... खुपच चालू आहे! She is just more than anyones imagination. मला वाटतं तुला आता तरी तिच्याबद्दल सगळं समजलंच पाहिजे."

     रवीला राग अनावर होत होता. ईतर कोणी त्याच्या वाईफबद्दल असं काही बोलला असता तर त्याची काही खैर् नव्हती. पण आता ती वेळ कधीच निघून गेली होती. हॉलमधल्या सोफ्यावर बसुन तो फक्त ऐकत होता.

"Actually तिच्या जाळ्यात आडकलेला मी काही पहिलाच नाही," मनोज शांतपणे म्हणाला. "माझ्या आगोदर सुध्दा होते,.... खुप जण होते....She enjoy all these. गेल्या पाच वर्षापासुन ति तुझ्याशी फ्रॉड करतेय रवी,.... She's nothing but a bitch, a Selfish bitch. सर्वात worst म्हणजे हे सर्वानां माहित आहे, Except you."

     सांगताना मनोजच्या चेहय्रावर उदासी पसरली होती, त्या सोबत अपराधीपणाची भावना सुध्दा त्याच्या बोलण्यात वाटत होती. 

"Yes, it"s really sad,...... तु ईतके वर्ष तिच्या सोबत प्रामाणिकपणाने राहिलास, तिला कुठला ड्रेस आवडतो, कुठला पर्फ्युम अवडतो, कुठली ज्वेलरी आवडते, तु तिची प्रत्येक आवड-निवड जपलीस, प्रत्येक लहान-सहान गोष्ट....., पण तुला तिचं खरा चेहरा कधीच कळला नाही"

     ईतका वेळ मनोजच्या चेहय्रावर जे टेन्शन होतं त्याची जागा आता सहानभुतीने घेतली होती. दोघांचाही चेहरा पडला होता.

     रवी अजुन निशब्दच होता. म्हणुन मनोजने हाताची बोट मोडत सांगायला सुरवात केली. "तिन महिने झाले असतील. प्रिया ने जस्ट दिपकला सोडले होते, आणि दुसरा टाईमपास शोधत होती. आणि मी भेटलो. Please dont mis-understand me... मी काही संत वैगेरे नाही, पण मला फक्त तिच्याकडून एखादा ग्रिन सिग्नल हवा होता. First time I was excited about all that..... तु ऑफिसमधे असायचास तेव्हा आम्ही भेटायचो. ती तुझ्याबद्दल नेहमी म्हणायची -माझा रवी,..... गरिब बिचारा, silly ***, बिजनेसमधे असा पार्टनर केला ना की एक्जीक्युटीव्हची काही गरज लागत नाही, Just support him in all his decisions and then U just enjoy the show"

"तुला माझ्यावर अजुन विश्वास वाटत नसेल तर नंतर ईतरांकडून खात्री करून घे. माझ्याबद्दल तुमचं काहिही मत असेल, पण पुढ काय करायच- that is you have to decide"

"मग,.... आता काय झाल?" खुप वेळा नंतर रवीने कसेतरी शब्द उच्चारले.

"आता सगंळ संपलय,  मला या सगळ्या चा कंटांळा आलाय, स्वःताचीच चिड येते. मी ईतका वाहवत कसा गेलो  स्वत:ला का? विचारत असतो. I just hate myself and her for all this. तिच असं वागण पाहून घृणाच वाटायला लागलेय. कधी वाटत for all this, I will just kill her."

     हे शब्द ऐकून लगेचच रवीचं लक्ष टेबलावर असलेल्या धार धार रेझरकडे गेलं. रेझरच्या शार्प ब्लेड्स कडे एकटक बघत मनोज म्हणाला
  
"काल रात्री ती माझ्या अपार्टमेंट मधे आली होती. आमच्यात कडाक्याच भांडण झाल. मी तीला समजावलं की आता सगळं संपलय, पण ती मानायला तयार नव्हती. तिला आता पर्यंत कोणीच नाकारलं नाही. तिला माझ्यासोबत हारल्यासारखं वाटत होत. त्यानंतर तिने हे सगळं तुला सांगून मला माझ्या जॉबची धमकी दिली and that time I was so angree की मी तिला बाहेर हकलून दिल."

"And then.....She comes here, at me.... ."

     क्षणभर दोघंही बोलण्याचं थांबले होते. कोणालाच पुढं काय बोलायचे कळत नव्हत.

"कसला विचार करतोस?" मनोजने विचारले.

"आता.... आता काय बाकी राहिलय विचार करायला, may be I will devorse her------- or--or am going to kill her-- and myself too"

"तिच्यासाठी असा वेडेपणा नको करू, ती त्या लायकच नाही."

"I dont know,.... पण तुला काय करायचय मी काहिही करेन,..... का तुला अजून तिची काळजी वाटतेय?"
त्या प्रश्नाच काहिच उत्तर नव्हत. मनोजच्या हालचालींवरून वाटत होतं की तो अजुबाजूला प्रियाच्या खाणाखूणा शोधतोय.

"प्रिया ठिक तर आहे ना?" मनोजने विचारले

     रवी त्याच्याकडे तुश्चतेने हसून म्हणाला, "तुला काय वाटतयं? की तु येण्याच्या अगोदरच मी तिचं काही बरंवाईट केलय? तुला तिची ईतकीच काळजी वाटत असेल तर तुच का नाही किचन, बेडरूम मधे चेक करत? Afterall ईतक झाल्यावर तुला माहितच असेल की काय कुठ आहे. प्रियानं सांगितले असतीलच"

     हे शब्द ऐकून मनोजला समजत नव्हतं कि पुढ काय करायच. उठून सरळ दरवाजाकडे गेला, दार उघडताना एक वेळ शेवटच मागे वळून म्हणाला, "मी आता सॉरी बोलण्यात काहिच अर्थ नाही. मला जॉब हवा होता, म्हणून मी प्रियाच्या ओळखीचा फायदा घेतला आणि नंतर हे सर्व झालं. But now am leaving this job. आता तरी ती मला ब्लॅकमेल नाही करू शकत. मला नविन जॉब मिळालाय, आऊट कन्ट्री मधे,... बस्! हे आयुष्य ईथच सोडून एक new beginning."

     रवी त्यावर काहिच म्हणाला नाही. तो अजून स्वःताच्याच जगात हारवला होता. ईशाय्रानेच त्याने मनोजला दरवाजा ओढून घ्यायला सांगितला. त्याची नजर फक्त फरशीवर पडलेल्या गडद लाल रंगाच्या डागावर खिळली होती. त्याचा नऊ वर्षाचा त्याचा संसार डोळ्यासमोर येत होता.


"हाय डार्लिंग, काय करतोस?", बेडमधून अचानक आलेल्या प्रियाच्या आवाजाने त्याला डिस्टर्ब केलं.

"आणि असा एकटक काय  बघतोयस?"

"काय? ह काही नाही, तुला जाग आली? मी ऐकलं नाही तु येताना" बोलताना त्याचा आवाज अडखळत होता. "आता तुला कसं वाटतय?"

"अजून डोकं जड आहे. विचित्र वाटतय. चक्करल्या सारखं. तुला माहिती आहे, रक्त बघितल्यावर मला कसं होतं. शेव्हींग करताना जरा निट केअर घेत जा ना"

"ह् आय ऍम सॉरी. आता ब्लिडींग तर थांबलय, पण वॉश बेसिन मधे डाग अजून तसेच असतील. ऍम रिअली सॉरी"

"आता सॉरी बोलून काय उपयोग? नुकसान व्हायच ते तर कधीच झालं?"

"Yes -- Yes, it is." रवी प्रियाच्या नजरेला नजर भिडवून बोलत होता.

     काही कारणास्तव त्याचे ते शब्द तिला डिस्टर्ब करून गेले. " अरे बेड मधे असताना कसला तरी आवाज येत होता, कोण आलं होतं?"

"अ! मनोज आला होता"

     मनोजचं नाव ऐकताच प्रियाने हडबडत विचारले "कोण मनोज?... मनोज कदम?"

"येस"

"हा तो तर ईथे नहमी येत जात असतो"

"का? मला वाटलं तु त्याला लाईक करतेस."

"हे बघ, मी तुझा कलिग्सशी पोलाईट वागते याचा अर्थ असा नाही होत That I like them. आणि तो तर जरा अकडूनच असतो. काल रात्री तर त्याने खुपच बोअर केलं."

"मला सांगितल नाहिस, की काल तु मनोजला भेटली म्हणुन."

"नाही सांगितल? ऍक्च्युअली आम्ही जस्ट भेटलो होतो, आणि त्याने ड्रिंक्स ऑफर केली. थोडावेळ तिन स्वत:च्या नवय्राकडे काळजीपुर्वक पहात विचारलं- "तो ईथं का आला होता?"

"काही विशेष नाही, सहजच, ऑफिसच काम होत. Nothing important."

     त्याच्या बोलण्यात आलेला सहजपणा पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला. मनातल्या मनात ती विचार करत होती 'बिचारा रवी, कामाव्यतीरीक्त त्याला कोणी काहीच सांगत नाही.' "अरे, तु अजून तयार नाही झालास? आजपण पार्टीला लेट झालं, तर ती मिसेस सक्सेना माहित आहे ना कशी आहे......तिच्या बोअरींग पार्टीज. I'm just sick of her"

     मागे वळून ती बेडरूमकडे जायला निघाली. मधेच वळून तिने रवीला विचारलं, "आता हे नको सांगुस की तुझी शेव्हींग अजून बाकी आहे" 

     रवी अजून गप्प होता. 

     मग तिने जरासं चिडल्यासारख करत विचारलं "याचं काम झाल की अजुन काही बाकी आहे?" बोलताना तिनं हातामधे रेझर पकडला होता. लाईट मधे त्याची ब्लेड चमकत होती, आणि त्याचा परावर्तन झालेला प्रकाश 
तिच्या नाजुकशा गळ्यावर पडला होता.


"नाही" शांतपणे तिच्या हातातून रेझर घेत रवी म्हणाला, "अजुन, थोड काम बाकी आहे"


गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

तहान

     "अरे यार! स्पिड वाढव !", अम्रेश ओरडला ," common~~ अजून स्पिड !"

     "८५ ला आहे", विराज समोर डोळे फाडून गाडी चालवत होता. एका हातात स्टिअरींग आणि एका हाताखाली गिअर रॉड सतत चेजं केल्याने त्याला कमालीचा घाम सुटला होता.

अम्रेशने रिअर ग्लासमधुन मागे बघीतले. "मागे पोलिस अजुनपण आहेत", अम्रेश म्हणाला, "चल यार! अजुन फास्ट". जंगलमधून जाणाय्रा त्या रस्त्यावर ४०० मिटरांच्या अतंरावर सायरन वाजवत रेड लाईट असलेली पोलिस कार त्यांचा पाठलाग करत होती. दुरून येणारा त्याचा आवाज हळुहळू कमी होत होता.

     "मागे एकदा.... मी बघीतलेला... हा.. ईथेच साईडला, एक चोर रस्ता आहे",  ईतके म्हणून विराज ने स्टीअरींग फिरवून सफाईदारपणे कार आडमार्गाला बाजूच्या झाडीमागे घेतली. कारचे सगळे लाईटस ऑफ केले.

मागून येणाय्रा पोलिसानां काहिच समजले नाही की कार अचानक कुठे गायब झाली. ते सायरन वाजवत सरळ रस्त्याने पुढे निघून गेले.

थोड्यावेळातच मुख्य रस्ता मागे सोडून विराज आणि अम्रेश त्या आडमार्गावर खुप दुर आले होते.

     "ते बघ तिकडे", विराज म्हणाला, "त्या लाईटस."

     "मला वाटत एखादं हॉटेल किंवा कुणाचतरी फार्म हाऊस आहे." अम्रेश खुश होऊन म्हणाला, "अशा या रस्त्याला पोलिसच काय पण त्यांचा बाप सुध्दा येणार नाही."

गेट समोर कार आल्यावर विराज ने जोरात ब्रेक दाबला. घराचा दरवाजा उघडाच होता. आत फक्त एक दिवा जळत असेल ईतकाच अधुंक प्रकाश होता. अम्रेशने बॅक सिटवर असलेली एक काळ्या रंगाची बॅग उचलली आणि ती घेऊन दोघानीं त्या घरामधे प्रवेश केला.

ते घर जुनं पुराण ईग्रंजाच्या काळातलं वाटत होत. जुन्या प्रकारचे लाकडी सोफा आणि खुर्च्या असलेले. भिंतीवर काही जुनाट तस्विरी. हॉलच्या एका बाजूने उतरणारा जिना. एखाद्या जुन्या काळच्या बंगल्याप्रमाणे.

अम्रेशने दरवाजावर ठोठवून करून विचारले, "HELLO~, कोई है क्या ईधर?" आवाज ऐकून एक वयस्कर माणूस जिन्यावरून खाली आला. "अरे काका, आम्ही जंगलात रस्ता चुकलोत. आज रात्रीसाठी ईथे थांबायला एखादी रूम मिलेगा क्या?" अम्रेशने विचारले.

तो वृध्द माणूस शांतपणे त्यांच्याकडे बघत बसला.

     "अरे अंकल, आज के लिये यहां रुकनेके लिये कुछ रूम वैगेरे मिलेगा क्या?" विराज ने पुन्हा विचारले.

तो वृध्द माणूस परत जाण्यासाठी मागे वळला.

     "ए म्हाताय्रा..." अम्रेश ने आवाज वाढवला, "मी काय विचारतोय, निट लक्ष दे, आम्हाला, रूम मिळेल का?" त्याचा हात जॅकेट मधे असलेल्या पिस्तूला कडे गेला होता. "फक्त आजची रात्र, सकाळी आम्ही निघुन जाऊ", अम्रेशने पिस्तूल त्या वृध्द माणसाकडे रोखत आदेश दिला.

अम्रेशकडे फक्त एक नजर टाकून तो वृध्द थरथरत जिन्याकडे गेला. जाता जाता कापय्रा आवाजात म्हणाला, "रूम न. पाच, वरच्या मजल्यावर आहे."

विराज आणि अम्रेश त्याच्या मागे मागे जिना चढू लागले. ती रूम हॉल पेक्षा वाईट अवस्थेत होती. खोलीमधे मधे कुबट वास पसरला होता. एक लोखंडी डबल बेड, बाजूला एक लाकडी स्टूल, भिंतीवर काच फुटलेला जुनाट आरसा आणि निघालेले वॉलपेपर आणि भकास वाटणाय्रा छताला लटकलेले झुंबर उगाचच आवाज करत होत.

     "ओह! काय बकवास जागा आहे", विराज ने कपाळाला आठ्या आणत म्हटले, "झुरळ आणि उदरांशिवाय ईथे काही सुध्दा मिळणार नाही."

     "अरे काका ईधर कुछ खाने-पिने के लिये कुछ मिलेगा क्या? खुप तहान लागलेय", अम्रेशने त्या म्हाताय्रा माणसाला विचारले. थोड्यावेळाने टक-टक दरवाजावर करून तो म्हातारा त्यांच्या रूम मधे आला. सोबत त्याने जुन्या दारूची एक बाटली आणि दोन ग्लास आणले होते. तिथेच असलेल्या स्टुलावर ठेवून काहीही न बोलता तो परत गेला.

     "तुला पिस्तूल दाखवायची काय गरज होती, त्या म्हाताय्राने पोलिसांना फोन-बीन केला तर?" विराजने अम्रेश ला विचारले. अम्रेश हसत म्हणाला, "अबे पागल है क्या? ईथे लाईटचा पत्ता नाही, दिव्यावर जगतोय तो म्हातारा. आणि फोन कुठून येणार? दारू पि साले.... और सो जा घोडे बेचके"

दोघानींही बाटली रिकामी केली. दिवसभर दमल्या मुळे त्या रूममधे सुध्दा त्या दोघानां लगेच गाढ झोप लागली.
दुसय्रा दिवशी सकाळी अम्रेशला जाग आली तेव्हा त्याचे हातपाय सुन्न पडले होते. रूममधे विराज आणि त्यांच्या बॅगचा पत्ता नव्हता. अम्रेशने बेडमधून उठण्याचा प्रयत्न केला. पण रात्री झोपून सुध्दा डोळ्यावरची झोप जाण्याच नाव घेत नव्हती. त्याने सगळी शक्ती एकटवून पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शरिरात त्राणच नव्हते. तेव्हाच दरवाजातून  रात्रीच्या म्हाताय्राने रूम मधे प्रवेश केला. अम्रेशला त्याच्या हातात असलेले ईजेक्शंन आणि औषधाची एक छोटीशी बाटली दिसत होती.

     "अरे, तुला जाग आली?" पांढरा फटक चेहरा पडलेल्या अम्रेशकडे बघत म्हातारा म्हणाला, "घाबरू नकोस, तुला काही होणार नाही. तुझा मित्र बाजूच्याच खोलीत आहे." सुई लावून त्याने अम्रेशच्या हातामधे ईंजेक्शन दिले. त्या ईजेंक्शनची जरा देखिल कळ त्याला हातामधे जाणवली नाही.

अम्रेशच्या कपाळावर घाम साचत चालला होता. रक्ताळलेल्या ओठांवर जिभ फिरवत म्हातारा म्हणाला, "पंचवीस वर्षापासून मी तहानलोय. तुम्ही यायला किती रे उशीर केलात."

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

भाग्यलक्ष्मी- हेवीवेट चॅम्पियनशीप



मॅचः भाग्यलक्ष्मी- हेवीवेट चॅम्पियनशीप
स्पर्धक: बाप्पा Vs. सरिता
व्हेन्यु: झी मराठी
दि. ३ सप्टे. २०१०
वेळ संध्या ७:३०








     टिव्हीच्या या कॉर्नरमधे आहेत उघडे-पोट, डोक्याला शेंडी आणि ३५० पौडं वजनाचे बाप्पा (टाळ्या आणि घोषणा 'बाप्पांचा विजय असो.' बाप्पा प्रतिस्पर्ध्याकडे गोलीअथ सारखा बघतो, विमान लॅन्डींगचा आवाज)टिव्हीच्या दुसय्रा कॉर्नर मधे आहेत बाप्पाच्या प्रतीस्पर्धी  सासु-घोषित नव-भाग्यल्क्ष्मी सरिता (सरिताचा नवरा तिच्या हाताला घट्ट् पकडून हाताची मालीश करतोय, सरिताची भलीमोठी सासु बाप्पाला खुन्नस देते, बाप्पा पुन्हा हसतो. कोणीच टाळ्या वाजवत नाही, पुन्हा दोन विमान लॅन्ड होतात)

     स्पर्धेचे नियम या प्रमाणे आहेत. तराजुच्या एका टोपल्यात बाप्पा फतकल मारतील आणि दुसय्रा पारड्यात सरिता बसेल. ज्याचे पारडे जड असेल त्याला विजेता घोषित करण्यात येईल. स्पर्धकाने तागडीमधे एकटच बसायच आहे, कोणीही जड सासुला अथवा नवय्राला घेऊन बसु नये. ईथे आपण स्पर्धा करायला आलो आहोत, तराजू तोडायला नाही. प्रत्येक स्पर्धकाला दैवशक्ती वापरण्यास परवानगी आहे. (आणखी दोन विमानं लॅन्ड होतात, दुर कोणीतरी डमरू वाजवायला लागतो) जिंकणाय्रा स्पर्धकाला अनडिस्प्युटेड हेवीवेट-चाम्पियन म्हणुन घोषित करण्यात येईल आणि  भाग्यलक्ष्मी या कार्यक्रमात पुढच्या अनेक वर्षांसाठी दररोज दिवसातुन दोन वेळा पब्लिकला टॉर्चर करण्याचा पास देण्यात येईल. (सरिताची सासु पुन्हा बाप्पाला खुन्नस देते, बाप्पा डोळे वटारून प्रतीस्पर्धी टिमकडे बघतो, सरिताचा नवरा अजुन हातमालिश करतोय) हारणाय्रा प्रतिस्पर्ध्याचे करिअर या मॅचनंतर संपुष्टात येईल. त्याला पुन्हा कोणत्याही मॅचमधे भाग घेता येणार नाही. प्रोत्साहनपर बक्षिस म्हणुन हारणाय्रा स्पर्धकाला कायम स्वरूपी वास्तव्य करण्यासाठी गावातील नदीचा तळ देण्यात येईल (बाप्पा डोळे वटारतो, आणि सरिताची सासु त्याच्यापेक्षा दिडपट डोळे वटारते. सरिताच्या नवय्राला डोळे वटारण्याची गरज नाही, त्याच्या डोळ्यात मेकअप मॅन ने मुक्तहस्ताने काजळ उधळलय, अजुन तीन विमानं). मॅच सुरू होण्याची बेल आणि त्यासोबत स्पर्धकानां प्रोत्साहन देण्यासाठी ढोलकं, ताशा वाजायला लागतात.

     वयाने आणि शरिराने जास्त असल्याने पहिला मान बाप्पांचा म्हणुन बाप्पा आखाड्यात पहिले उतरतात. गजगामिनीला देखिल लाजवतील अशी चाल करत एका टोपल्यात जाऊन बसतात (कर्रर आवाज... बाप्पांचा विजय असो!- घोषणा). बाप्पांची सलामी एन्ट्री पाहून सरिताला मॅच खेळायची का नाही असा प्रश्न पडतो. ती कच खाऊन माघार घेणारच असते पण तीची सासू आणि तीचा नवरा वेळेवर तीला प्रोत्साहन देतात. तीला सपोर्ट करण्यासाठी सरिताचे ईतर फॅमिली मेंबर्स म्हणजे तीची थोरली जाऊ काशी आणि दिर देखिल स्टेडिअम मधे दाखल होतात. सरिताचा दिर मॅचबद्दल खुपच एक्सायटेड आहे. तो दोन्ही हात आणि डोके(?) एकाचवेळी हालवून सरिताला चिअर-अप करतो. नवरोबा आणि सासुच्या सुचनेनुसार सरिता आखाड्यात प्रवेश करते आणि पारड्यात जाऊन बसते.

     पुढे काय होणार सगळ्यांना उस्तुकता वाटते, विमान आणि बॉम्बचा वर्षाव होत असतो. ढोलकी-ताशे वाजत्री सुध्धा रंगात आलेले असतात. सरिता रिकाम्या पारड्यात जाऊन बसल्यावर बाप्पाच्या वजनाने खाली गेलेली तराजू तसूभर देखिल हालत नाही. ईतक्यात कोणीतरी 'आली आली भाग्यलक्ष्मी' चे गाणे सुरू करतो. कॅमेरा काशीच्या दिशेला जातो, जाडाढोल बाप्पाचे टोपले कापुस भरल्या सारखे वर जायला लागते. मॅचने अचानक फिरल्यामुळे बाप्पाच्या डोक्यावर घाम यायला लागतो. निर्णायक स्थानी मॅच आल्याने पब्लिकची उत्कठां शिगेला पोहोचते. अखेर सरिताचं पारडं जमिनीला टेकते. सकाळी दाबून मसाले भात खाल्ल्याने फायदा झाला पाहून सरिता सुटकेचा स्वास सोडते.  सरिताला हेवीवेट दैवी चॅम्पियन म्हणुन घोषित करण्यात येतं.

     सरिताची सासू, नवरा आनदोंत्सव साजरा करतात. काशीच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहायला लागतात. मैच संपली तरी काशीचा नवरा हात आणि मान हालवत आनंद साजरा करतो. सरिताची आखाड्यापासुन ते घरापर्यंत लाल-गुलाल, हळद उडवत मिरवणुक येते.

     तेवढ्यात छोट्या काशीचा प्रवेश होतो, आणि ती स्व;ताशीच पुटपूटते, 'मला माहिती होते की ती जिंकणारच होती, तीच्यासोबत तराजूत सात बुटके जे बसले होते'

*सुचना: या कार्यक्रमाचे प्रक्षेपण शुक्रवार दि. ३ सप्टे. २०१० रोजी संध्या ७:३० वाजता करण्यात येईल, प्रेक्षकानीं स्व:ताच्या रिस्कवर कार्यक्रम बघावा.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...